vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी बांधावर;पीक पाहणी करुन शेतकऱ्यांशी साधला संवाद

जिल्हाधिकारी बांधावर;पीक पाहणी करुन शेतकऱ्यांशी साधला संवाद

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत आज जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
जिल्हाधिकारी गौडा यांनी आज दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माळीवाडा ता.छत्रपती संभाजीनगर, सराई ता.खुलताबाद, वारेगाव ता.फुलंब्री, चौका ता. छत्रपती संभाजीनगर या परिसराचा पाहणी दौरा केला . पिकांच्या स्थितीचे अवलोकन करुन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, तहसीलदार शिवानंद बिडवे तालुका कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद, फुलंब्री व अन्य अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा शेतकऱ्यांशी संवाद साधतांना म्हणाले की, शेतकऱ्यांनी सकारात्मक राहून पंचनामे करण्याकामी शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे. शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. कुठल्याही पात्र शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही. याची खात्री मी स्वतः करणार आहे. पिण्याच्या पाण्याचे साठ्यांमधील अनधिकृत पाणी उपसा बंद करून पिण्याचे पाणी संरक्षित केले जाईल आणि संबंधित यंत्रणेला योग्य ते आदेश दिले जातील असेही जिल्हाधिकारी गौडा यांनी आश्वासित केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाणी, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा छावण्यांची आवश्यकता तसेच रोजगाराच्या उपलब्धतेबाबतही आढावा घेण्यात आला. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाच्या निकषांनुसार मदत व सवलती उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
पिकांची सद्यस्थिती, उत्पादनातील संभाव्य घट आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या तातडीच्या उपाययोजनांचे मूल्यांकन करून संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, तसेच पाणी बचत, उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर आणि पर्यायी पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश देण्यात आले.
०००००

संबंधित पोस्ट

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार-पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

खतांची आगाऊ बुकिंग आता एफएफएस प्रणालीद्वारे

काँग्रेसने संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान केल्याने जालन्यात भाजप आक्रमक, जोरदार निषेध आंदोलन संसदेचा अवमान हा देशाचा अपमान – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचामुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ•उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती