
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६जिल्ह्यात २३२८७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणअद्यापही बाकी, तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये एकूण ९३२६८ शेतकऱ्यांचे कर्ज खात्यात एकूण रक्कम ६९८ कोटी ९३ लाख रुपये इतकी रक्कम जमा होऊन त्यांचे कर्जखाते निरंक केले आहेत. तथापि, प्रसिद्ध झालेल्या यादीतील २३२८७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे अद्याप बाकी आहे. तरी या शेतकऱ्यांनी तातडीने आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व बँकांनी १९०७०१ शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफी योजनेचे पोर्टलवर अपलोड केली आहे. यापैकी १२६२८६ शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकाची यादी आधार प्रमाणीकरण (e-KYC) करण्यासाठी प्रसिद्ध झाली असून १०२९९९ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात शासन स्तरावरून ऑनलाइन पद्धतीने रकमा जमा करण्यात आल्या आहेत. दि. १ ऑक्टोंबर पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९२९ कर्जखात्यांमध्ये ८ कोटी ८४ लक्ष रुपये इतर बँकांच्या १६३९४ कर्जखात्यांमध्ये १७१ कोटी ५९ लक्ष रुपये असे एकूण १८ हजार ३२३ कर्जखात्यांमध्ये एकूण १८० कोटी ४३ रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये एकूण ९३२६८ शेतकऱ्यांचे कर्ज खात्यात एकूण रक्कम ६९८ कोटी ९३ लाख रुपये इतकी रक्कम जमा होऊन त्यांचे कर्जखाते निरंक केले आहेत. तथापि, अद्याप २३२८७ शेतकऱ्यांचे आधारप्रमाणीकरण बाकी आहे.
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या यादी जिल्ह्यातील सर्व बँकशाखा/विका संस्था/आपले सरकार सेवा (ASSK) केंद्र/ग्रामपंचायत/तलाठी कार्यालय/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सेवा केंद्रात त्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक व बंधनकारक आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीतील २३२८७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे अद्याप बाकी आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण (e-KYC) तातडीने करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्फत करण्यात येत आहे.
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी यादीमध्ये नाव समाविष्ट असल्याची खात्री करून अॅप्लीकेशन क्रमांक, मूळ आधारकार्ड व बचत खात्याचे पासबुक घेऊन समक्ष आपले सरकार सेवा (ASSK) केंद्रावर जाऊन तातडीने आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर व उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयांशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
००००००



