vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरातील वीजसमस्या सोडवा, २५ नवीन रोहित्रे मंजूर करा – भास्कर आबा दानवे- विद्युत खांब, लोंबकळणाऱ्या तारांसह पथदिव्यांच्या समस्यांबाबत ऊर्जाराज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना निवेदन

जालना शहरातील वीजसमस्या सोडवा, २५ नवीन रोहित्रे मंजूर करा – भास्कर आबा दानवे- विद्युत खांब, लोंबकळणाऱ्या तारांसह पथदिव्यांच्या समस्यांबाबत ऊर्जाराज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना निवेदन

जालना (प्रतिनिधी): जालना शहरातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या सोडविण्यासह शहरातील विद्युत यंत्रणा अधिक सुरक्षित व सक्षम करण्यासाठी किमान २५ नवीन वितरण रोहित्रे (डीटीपी) मंजूर करावीत, अशी मागणी भाजपा-जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी राज्याच्या ऊर्जाराज्यमंत्री मेघना दीदी साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जालना शहरातील विविध भागांत रस्त्यांच्या मधोमध असलेले विद्युत खांब, वाकलेले व जीर्ण खांब, लोंबकळणाऱ्या वीजतारा तसेच कमी दाबाने होणारा वीजपुरवठा आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्यांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी दानवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, जालना शहराची वाढती लोकसंख्या, नवीन वसाहतींचा विस्तार आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेता सध्याच्या वितरण यंत्रणेवर अतिरिक्त भार पडत आहे. काही भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होणे आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन शहरातील गरजेनुसार किमान २५ नवीन वितरण रोहित्रे मंजूर करून बसविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर विद्युत खांब असूनही पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आवश्यक ठिकाणी नवीन पथदिवे बसविणे आणि पथदिव्यांसाठी टाइमर किंवा प्रकाशसंवेदकावर आधारित स्वयंचलित यंत्रणा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. यामुळे रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश उपलब्ध होण्यासोबतच दिवसा सुरू राहणाऱ्या पथदिव्यांमुळे होणारा विजेचा अपव्यय टाळता येईल.

रस्त्यांच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत आहे. तसेच काही भागांतील वाकलेले व जीर्ण खांब आणि खाली लोंबकळणाऱ्या वीजतारांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर धोकादायक खांबांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती किंवा आवश्यकतेनुसार बदली करावी, रस्त्यातील खांब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावेत आणि वीजतारा उंचीवर ठेवून सुरक्षित कराव्यात, याशिवाय रस्त्यालगत असलेल्या डीपी व ट्रान्सफॉर्मरभोवती सुरक्षा कुंपण, धोक्याचे फलक आणि योग्य अर्थिंगची व्यवस्था करणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणाऱ्या भागांत रोहित्रांची क्षमता वाढविणे, वीजवाहिन्या व उपकरणांची दुरुस्ती करणे आणि नवीन वसाहतींमध्ये गरजेनुसार विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, शहरातील प्रमुख चौक, गर्दीच्या बाजारपेठा ठिकाणी तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून भूमिगत वीजवाहिन्यांचा टप्प्याटप्प्याने विचार करावा, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे आणि शहरातील विद्युत खांब, वीजतारा व रोहित्रांची नियमित तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.शहरातील प्रमुख रस्ते, चौक, शाळा, रुग्णालये, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणचे कामे तात्काळ पूर्ण करावीत, असेही भास्कर आबा दानवे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

गोवर्धन कोल्हे

 

९४०४०३७७७८

संबंधित पोस्ट

मराठीवरील प्रभुत्त्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मार्डी येथे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा मुक्कामी दौरा महिलांच्या हॉलचा प्रश्न जागेवरच निकालीअवैध दारू विक्रीवर कडक कारवाईचे निर्देश

आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला.

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली-हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस..

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आणि सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आढावा बैठकीत दिला विश्वास

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील शेवगाव – पाथर्डीच्या पाणीटंचाई निवारणासाठी २० कोटींचा निधी ; वांबोरी चारीच्या कामांना गती