vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दसरा सणाच्या पार्श्वभूमिवर 25 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश जारी…

दसरा सणाच्या पार्श्वभूमिवर 25 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश जारी…

      सां : सांगली प्रतिनिधी जिल्ह्यात दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी दसरा सण उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. दसरा सणाच्या अनुषंगाने दुर्गामाता प्रतिमा/ मुर्तीच्या मिरवणुकांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करून त्यांचे विसर्जन केले जाते. या सर्व बाबींवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी 19 ऑक्टोबर 2026 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते 25 ऑक्टोबर 2026 रोजीचे 22.00 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.

     महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) प्रमाणे प्रदान अधिकारान्वये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकारान्वये पोटकलम (एम) प्रमाणे हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. यानुसार पाणी पुरवठ्याचे कोणतेही साधन किंवा पात्र किंवा पाणीपुरवठा पूर्णपणे किंवा विवक्षित प्रयोजनांसाठी बंद करण्याविषयी किंवा अशा साधनांचा किंवा पात्रांचा किंवा पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर न करण्याविषयी निदेश देणे किंवा असा वापर विवक्षित प्रयोजनांसाठीच करण्याविषयी निदेश देणे आणि असे साधन किंवा पात्र किंवा त्यातील पाणी दूषित होऊ नये याकरिता मनाई करण्यात आली आहे.

 

   सद्यास्थितीत राज्यासह सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्त मोठ्या प्रमाणावर असून दि. 15 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हाधिकारी सांगली यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यालयात नवरात्र मंडळ पदाधिकारी यांची बैठक घेऊन सद्यस्थितीला सांगली कृष्णा नदीमध्ये पाण्याची पातळी कमी असल्याने व पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका क्षेत्रातील नवरात्र उत्सव मंडळानी दुर्गादेवी मुर्ती विसर्जन हे मिरज गणेश तलाव येथे विसर्जन करण्याचे तसेच मुर्ती विसर्जन न करता ती सुरक्षित ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

संपूर्ण सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पुरवठ्यांच्या स्त्रोतमध्ये मुर्ती पुर्णपणे पाण्यात विसर्जित होणार नसल्याने मुर्तीची विटंबना होण्याची शक्यता असून त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३१ प्रमाणे कारवाईस पात्र राहील, असे आदेशात म्हटले आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठीपात्र व्यक्तींनी ३१ मेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद कामकाज/नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा-अमरावती ‘एमआयडीसी’साठी सकारात्मक निर्णय घेणार – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळाचे राज्यातील जनतेकरिता मंत्रिमंडळ निर्णय…

vishwatmaklokswamivarta

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

vishwatmaklokswamivarta

महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडल्याची भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली