vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सेवा संकल्प अभियानाला सायकल रॅलीची जोड मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सेवा संकल्प अभियानाला सायकल रॅलीची जोड मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग…

मुंबई, प्रतिनिधी: सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून जनसेवेसोबतच आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांच्या नियोजनातून ही रॅली उत्साहात पार पडली

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित या सायकल रॅलीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘निरोगी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सहभाग’ याचा संदेश दिला

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेली रॅली गेटवे ऑफ इंडिया मार्गे एनसीपीए, मरीन ड्राईव्ह येथे पोहोचून उत्साहात संपन्न झाली.रॅलीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, तहसीलदार डॉ. मानसी मार्लेवार, माय भारतचे उपसंचालक अनुप इंगवले, नायब तहसीलदार प्रभाकर नाईक यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी लावणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

महापौर कार्यालय-लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर शर्मिला पिंपळोलकर

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्तेखादी ग्रामोद्योग उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन· मंत्रालयात १ ऑक्टोबरपर्यंत खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या खरेदीची संधी· महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय ‘नशामुक्त भारत’ स्पर्धांचे २९ जुलै रोजी आयोजन राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साही स्वागत..

पुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!