vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

8 ऑक्टोंबरला महसूल लोकअदालत; प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने होणार निपटारा शेतकरी व नागरिकांनी लाभ घ्यावा

8 ऑक्टोंबरला महसूल लोकअदालत; प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने होणार निपटारा शेतकरी व नागरिकांनी लाभ घ्यावा

बुलढाणा, प्रतिनिधी: बुलढाणा उपविभागांतर्गत बुलढाणा व चिखली तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या महसूलविषयक प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान राबविण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित दावे, वाद तसेच अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने बुलढाणा तालुक्यातील नागरिकांसाठी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे, तर चिखली तालुक्यातील नागरिकांसाठी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, चिखली येथे महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये महसूल प्रकरणे, अर्ज, महसूल न्यायालयासंदर्भातील दावे, वाद तसेच अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे. संबंधित नागरिकांनी आपली प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे उपविभागीय अधिकारी कार्यालय, बुलढाणा किंवा तहसील कार्यालय, चिखली येथे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महसूलविषयक प्रलंबित प्रकरणांचा तातडीने व तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्यासाठी नागरिक आणि शेतकऱ्यांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

कर्णपूरा यात्रोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे– जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

महाडच्या हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी !हुतात्मा कमलाकर दांडेकर यांच्या नावाने स्मारक ओळखले जाणार; महाडच्या हुतात्मा दिनाचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी कॅबिनेटमध्ये विषय मांडणार : पालकमंत्री भरतशेठ गोगावले

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्ततेसाठी 07 जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ

कौशल्य विकास विभागातर्फे निबंध स्पर्धा

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला आज १ एप्रिल पासून प्रारंभ

जलसंधारणासाठी वन विभागाचा पुढाकार,शिराळा, वाळवा तालुक्यात श्रमदानातून 38 वनराई बंधारे पूर्ण…

vishwatmaklokswamivarta