कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेअंतर्गत ९.६६ हेक्टर जमीन वाटपासाठी निवड
बुलढाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे
या योजनेंतर्गत खामगाव तालुक्यातील मौजे ढोरपगाव येथे शासनाने खरेदी केलेली एकूण ९.६६ हेक्टर जमीन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित गावातील ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत प्राप्त भूमिहीन व गरीब लाभार्थ्यांच्या यादीतून एकूण सहा लाभार्थ्यांची जमीन वाटपासाठी निवड करण्यात आली आहे
या निवडीबाबत अनुसूचित जातीच्या भूमिहीन लाभार्थ्यांना काही आक्षेप असल्यास त्यांनी आपले आक्षेप दि. ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, बुलढाणा यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.