vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 मार्च रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलन

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 मार्च रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलन

नांदेड, l प्रतिनिधी :- कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2025-26 अंतर्गत सोमवार दि. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा नांदेड येथे खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनास जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक, खरेदीदार-विक्रेते, कृषी विद्यार्थी तसेच नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

या संमेलनामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित राज्य व जिल्ह्यातील खरेदीदारांना एकत्र आणून परस्पर संवादाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे विक्रेते आणि खरेदीदार यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होऊन करार व विपणनाच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे

संमेलनात एमएसआरएलएम व एसयूएलएम अंतर्गत बीज भांडवल व गट लाभार्थी महिलांचाही सहभाग राहणार असून अन्न प्रक्रियेशी संबंधित प्रक्रिया केलेले पदार्थ, भौगोलिक मानांकन असलेली उत्पादने तसेच सेंद्रिय प्रक्रिया केलेल्या पदार्थांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासोबतच बाजारपेठ उपलब्धता, पिकांचे मूल्यवर्धन, ई-मार्केटिंग यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच बँकांच्या प्रतिनिधींच्या सहभागातून आर्थिक सहाय्याबाबत माहिती दिली जाणार आहे. ओएनडीसी, जीईएम तसेच डी-मार्ट, रिलायन्स, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बिगबास्केट आदी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मबाबतही माहिती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

आयपीएल विजेता रॉयल चॅलजर्स बंगळूरू संघाच्या विजयी सोहळ्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान चार जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे, तर अनेक जण जखमी झाले

vishwatmaklokswamivarta

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

vishwatmaklokswamivarta

दिघा परिसरातील उग्र वासाच्या तक्रारीच्या अनुषंगाने मध्यरात्रीच्या गस्तीत केमिकल टँकर जप्त

मतदान यंत्र तपासणी कार्यक्रम  सुरू२१ ते २३ जुलै दरम्यान चालणार प्रक्रिया

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी दिली परीक्षा*4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली* 

जे जे रुग्णालयातील नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस उपकरणाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta