HDFC च्या चेअरमनचा अचानक राजीनामा, गुंतवणूकदारांना 1 लाख कोटी रुपयांचं नुकसान
राज्य प्रतिनिधी- देशातील सर्वात मोठी प्राव्हेट बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये (HDFC Bank Shares) गुरुवारी मोठी घसरण झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारातच बँकेचा शेअर हा 8 टक्क्यांनी कमी होऊन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने एचडीएफसीच्या गुंतवणूकदारांना 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे. एचडीएफसी बँकेचे पार्टटाइम चेअरमन अतनु चक्रवर्ती यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याची माहिती आहे.
एचडीएफसी बँकेच्या पार्ट टाइम चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अतनु चक्रवर्तीने बुधवारी अचानकपणे राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबाबत विस्तृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही पण सांगितलं जातंय की ते त्यांनी वैयक्तिक मूल्ये आणि नैतिकतेमुळे राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘गेल्या दोन वर्षांत, बँकेतील काही घटना आणि कार्यपद्धती त्यांच्या वैयक्तिक मूल्यांशी विसंगत होत्या’. अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा 19 मार्चपासून अंमलात आला आहे. अतनु चक्रवर्ती यांनी राजीनाम्याच्या काय म्हटले?
अतनु चक्रवर्तीने आपल्या राजीनाम्याच्या लिहिले की, ‘गेल्या दोन वर्षांत बँकेत मी पाहिलेल्या घटना आणि कार्यपद्धती माझ्या वैयक्तिक मूल्यांशी विसंगत आहेत. हेच माझ्या राजीनाम्याचे मुख्य कारण आहे’. अतनु चक्रवर्ती यांनी त्यांनी असेही सांगितले की त्यांच्या राजीनाम्यामागे दुसरे कोणतेही कारण नव्हते. त्यांनी आपल्या राजीनाम्यात कोणत्याही विशिष्ट घटनेचा उल्लेख केला नाही, परंतु त्यांनी राजीनाम्यात नमूद केलेले कारण बँकिंग क्षेत्रात चर्चेचा विषय बनले आहे.
कोण आहेत अतनु चक्रवर्ती?अतनु चक्रवर्ती 1985 बॅचचे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये इकोनॉमिक अफेअर सेक्रेटरी आणि डिसइन्वेस्टमेंट सेक्रेटरीच्या रूपात महत्वाची भूमिका निभावली. एप्रिल 2021 मध्ये ते आरबीआयकडून त्यांना एचडीएफसी बँकेच्या पार्ट टाइम चेअरमनपदी नियुक्त करण्यात आले होते. मे 2024 मध्ये त्यांचा कार्यकाळ वाढून 2027 पर्यंत झाला होता. त्यांच्याच कार्यकाळात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांचे 40 अब्ज डॉलर्सचे विलीनीकरण झाले, ज्यामुळे ही बँक देशातील सर्वात मोठी खाजगी प्राइवेट लेंडर संस्था बनली.
अमेरिकेच्या लिस्टेड शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घट : एचडीएफसी बँकेने स्टॉक एक्सचेंजला अतनु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली आहे. बँकेने हे सुद्धा सांगितलं की, अतनु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्या मागे त्यांनी पत्रात लिहिलेल्या कारणांशिवाय इतर कोणतीही कारणं नव्हती. आरबीआयने लगेचच कारवाई केल्यावर केकी मिस्त्रीला तीन महिन्यांसाठी पार्ट टाइम चेअरमन म्हणून नियुक्त केलं आहे. या बातमीनंतर, बँकेच्या अमेरिकेच्या लिस्टेड शेअर्समध्ये 7 टक्क्यांची मोठी घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरही हा स्टॉक 8 टक्क्यांनी घसरून 52 आठवड्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला. नेतृत्वातील या अचानक बदलामुळे बँकेच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे.