vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सातारा जिल्ह्यात ३५ टँकरद्वारे पाणी पुरवठा

सातारा जिल्ह्यात ३५ टँकरद्वारे पाणी पुरवठा

सातारा प्रतिनिधी: जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील ३९ गावे आणि २३६ वाड्यांमधील ५४, २५७ नागरिक आणि ४१,१०७ पशुधनाची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एकूण ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये १ शासकीय आणि ३४ खाजगी टँकरचा समावेश तसेच पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने १६ विहिरी आणि ९ बोअरवेलचे अधिग्रहित केले आहे

  माण तालुक्याला ३१ गावे आणि २०० वाड्यांमधील ४५,७०२ लोकसंख्या बाधित झाली आहे. माण तालुक्यात ३८,९७२ पशुधन देखील बाधित असून तेथे १ शासकीय व २९ खाजगी अशा एकूण ३० टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे, तसेच १० विहिरी आणि ६ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या तालुक्यात दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे मलवडी, मलवडी, आंधळी आणि कुकुडवाड वर्तुळातील गावांना टँकरने पाणी दिले जात आहे.

खटाव तालुक्यातील ७ गावे आणि ३६ वाड्यांमधील ७,८३३ नागरिकांना ४ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. खटावमध्ये ६ विहिरी आणि ३ बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या असून मायणी, का. खटाव, बुध आणि कलेढोण परिसरातील गावांमध्ये पाण्याचे वाटप केले जात आहे.

फलटण तालुक्यातील दुधेबावी मंडळातील एका गावातील ७२२ नागरिकांसाठी १ खाजगी टँकर सुरू करण्यात आला आहे. सध्या प्रशासन टंचाईग्रस्त भागांत टँकरच्या फेऱ्या आणि विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

0000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा राष्ट्रीय लोकअदालतीत राज्यात प्रथम१ अब्ज ४९ कोटींहून अधिक रकमेची तडजोड यशस्वी!

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार-शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प…

ऑटो रिक्षा व टॅक्सी नवीन परवान्यांच्या इरादापत्रांचे वितरण स्थगित

धरण परिसरात पर्यटन विकासाला प्राधान्य – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश

vishwatmaklokswamivarta

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोबोटिक्स ॲण्ड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाचे भूमिपूजन