vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

काल्हेरमधील विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याबाबत विधी जनजागृती

काल्हेरमधील विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याबाबत विधी जनजागृती

ठाणे प्रतिनिधी : विद्या प्रसारक मंडळाच्या टीएमसी लॉ कॉलेज, ठाणे येथील द्वितीय वर्ष एलएल.बी.चे विद्यार्थी श्रावण शिवदास पवार यांनी केदार क्लासेस येथे `माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 ‘ या विषयावर विधी जनजागृतीपर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम बुधवार, दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात पवार यांनी माहितीचा अधिकार कायद्याचे महत्त्व सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्ट केले. म्हणजे काय, कोण अर्ज करू शकतो, जन माहिती अधिकारी यांची भूमिका, अर्ज करण्याची पद्धत, माहिती मिळण्याची कालमर्यादा, माहिती न मिळाल्यास प्रथम व द्वितीय अपीलची प्रक्रिया, तसेच कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी माहितीचा अधिकार अधिनियमातील कलम 3 मधील नागरिकांचा माहितीचा अधिकार, कलम 4 मधील लोक प्राधिकरणांची कर्तव्ये, कलम 6 मधील अर्ज प्रक्रिया, कलम 7 मधील माहिती देण्याची कालमर्यादा, कलम 8 मधील अपवाद, कलम 19 मधील अपीलची तरतूद आणि कलम 20 मधील दंडाची तरतूद यांची माहिती उदाहरणांसह देण्यात आली.

सामान्य प्रकरणात अर्जावर 30 दिवसांच्या आत माहिती देण्याची तरतूद असून, एखाद्या व्यक्तीच्या जीवन किंवा स्वातंत्र्याशी संबंधित माहिती 48 तासांच्या आत देण्याची तरतूद असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच अर्जामध्ये अस्पष्ट प्रश्न विचारण्याऐवजी संबंधित शासकीय अभिलेख, आदेश, कार्यादेश, बिले, अहवाल, खर्चाचा तपशील व प्रमाणित प्रती नेमकेपणाने मागणे अधिक प्रभावी ठरते, असेही त्यांनी सांगितले.

रस्त्यांची कामे, शासकीय खर्च, शिष्यवृत्ती, कल्याणकारी योजना, सार्वजनिक कामांचे करार, भरती प्रक्रिया आणि विविध शासकीय कार्यालयांतील अभिलेख याबाबत माहिती मिळविण्यासाठी चा कसा उपयोग करता येतो, हेही व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले.

याप्रसंगी केदार क्लासेसचे संचालक सुदाम विठ्ठल केदार उपस्थित होते. त्यांनी विधी जनजागृतीसाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

“माहितीचा अधिकार हा केवळ माहिती मिळविण्याचे साधन नसून शासनाच्या कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविणारे आणि नागरिकांना सक्षम करणारे महत्त्वाचे कायदेशीर माध्यम आहे,” असा संदेश श्रावण शिवदास पवार यांनी यावेळी दिला.

विद्या प्रसारक मंडळाच्या टीएमसी लॉ कॉलेजच्या विधी जनजागृती उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार कायद्याची व्यावहारिक ओळख झाली.

00000

संबंधित पोस्ट

मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू होणार;मतदारांनी बीएलओ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

सातारा जिल्हा पोलीस क्रेडिट को-ऑप. सोसायटीतर्फे भव्य विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

राज्यांतर्गत पीकस्पर्धेसाठी अर्ज सुरू; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*खरीप हंगाम २०२६ मध्ये ११ पिकांसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धा; राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास ५० हजारांचे बक्षीस

खामगावचा गुरुवारचा आठवडी बाजार पुढे ढकलला

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात 111 जागांसाठी कोतवाल भरती जाहीर 7 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू

महानगर प्रदेशात महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी अभिनव प्रकल्पाचा प्रस्ताव-छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta