vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात 111 जागांसाठी कोतवाल भरती जाहीर 7 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू

ठाणे जिल्ह्यात 111 जागांसाठी कोतवाल भरती जाहीर 7 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू

ठाणे, प्रतिनिधी: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहिरात क्रमांक ०१/२०२६ अन्वये जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील एकूण 111 रिक्त पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे.

शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 20 ऑगस्ट 2025 च्या पत्रानुसार या भरतीस विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून पात्र उमेदवारांना https://thane.kotwal.org या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागणार आहे.      जिल्ह्यातील विविध तहसिल कार्यालयांतर्गत पदांचे वितरण खालीलप्रमाणे आहे: • अंबरनाथ: २१ पदे (सर्व सर्वाधिक)• ठाणे: २४ पदे• कल्याण: १४ पदे • भिवंडी: १४ पदे (नॉन-पेसा: ११ | पेसा: ३)• मुरबाड: १९ पदे (नॉन-पेसा: ११ | पेसा ० ते २५%: ४ | पेसा २५% पेक्षा जास्त: ४) • शहापूर: १९ पदे (पेसा २५% पेक्षा जास्त: ११ | पेसा ० ते २५%: ८)      या भरतीमध्ये अनुसूचित जाती (१३%), अनुसूचित जमाती (७%), विमुक्त जाती-अ (३%), भटक्या जमाती-ब (२.५%), भटक्या जमाती-क (३.५%), भटक्या जमाती-ड (२%), विशेष मागास प्रवर्ग (२%), इतर मागास वर्ग (१९%), सामाजिक आणि शैक्षणिक मागास (१०%), आर्थिक दुर्बल घटक (१०%) आणि अराखीव (खुला) प्रवर्ग (२८%) यानुसार सामाजिक आरक्षण लागू आहे. तसेच महिलांसाठी ३० टक्के समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे. (टीप: परिस्थितीनुसार पदांच्या संख्येत आणि आरक्षणात बदल होऊ शकतो.)भरती प्रक्रियेचे महत्त्वाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे (२०२६):* ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: ७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत)* परीक्षा शुल्क भरण्याची मुदत: २२ ऑक्टोबर (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत)* अर्जांची छाननी: २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर* प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध कालावधी: ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर* प्रत्यक्ष परीक्षा दिनांक: रविवार, १५ नोव्हेंबर* उत्तरसूची व निकाल: १६ नोव्हेंबर* कागदपत्र पडताळणी: १७ ते २७ नोव्हेंबर*

नियुक्तीपत्र वाटप: २८ नोव्हेंबर       उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://thane.kotwal.orgअधिकृत संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज व परीक्षा शुल्क भरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

धारावी मुकुंद नगर येथे पाटील परिवाराचा मानाचा गणपती घरगुती गणपती चला दर्शनाला

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७ साठी आज १ मे पासून होणार स्वयं-नोंदणी सुरू-नागरिकांनी सहभागी होण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. 

मंठा तालुक्यातील अंभोडा कदम येथे किशोरवयीन मुलींचा मेळावा उत्साहात

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या प्रकरण-आता डायरेक्ट इन्काऊंटर करा -प्रवीण तरडे अभिनेता

राज्यस्तरीय लेखापरीक्षक नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज मागविणे सुरू