vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मंठा तालुक्यातील अंभोडा कदम येथे किशोरवयीन मुलींचा मेळावा उत्साहात

मंठा तालुक्यातील अंभोडा कदम येथे किशोरवयीन मुलींचा मेळावा उत्साहात

 

जालना, प्रतिनिधी : जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ मंठा तालुक्यातील अंभोडा कदम येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि आयुष्मान आरोग्य मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक समस्या, योग्य आहार, वैयक्तिक स्वच्छता तसेच किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शिका प्रा. चारुलता पाटील, डॉ. नागरगोजे, डी.एम. अंभोडा कदम, आरोग्य सेविका शुभांगी रतन रोटे आणि प्रा. सरवदे यांनी किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारून मार्गदर्शकांशी संवाद साधला. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थिनी तसेच त्यांच्या माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात पुरेसा जलसाठा उपलब्ध; पाटबंधारे विभागाची माहितीअफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात माय मराठीचा जागर!मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते,मातृभाषेच्या सन्मानासाठी सर्वजण पुढाकार घेऊया- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे..

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त**अन्य 19 तालुक्यांत सर्वेक्षण करण्याचे निर्देश* *प्रमुख पाच पिकांचे 20 टक्के सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा*• *चारा-पाणी उपलब्धता, कर्जवसुली आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेवरही भर*

vishwatmaklokswamivarta

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026 99.78 टक्के मतदान, आठ पैकी सात केंद्रावर शंभर टक्के मतदान

दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी २.० अर्ज प्रक्रिया सुरूनवीन ‘महाआयडी’ अनिवार्य; अर्ज प्रलंबित न ठेवण्याच्या महाविद्यालयांना सूचना..