vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरटीओ पनवेलमध्ये नागरिकांसाठी मदत केंद्र; 65 हून अधिक फेसलेस सेवांचा लाभ घ्या

आरटीओ पनवेलमध्ये नागरिकांसाठी मदत केंद्र; 65 हून अधिक फेसलेस सेवांचा लाभ घ्या

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी: नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी खारघर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल (आरटीओ) येथे नागरिक मदत व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच वाहन आणि वाहनचालक अनुज्ञप्तीशी संबंधित विविध ऑनलाइन व फेसलेस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आपला वेळ वाचवावा आणि मध्यस्थांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू करण्यात आलेल्या मदत व मार्गदर्शन केंद्रामध्ये नागरिकांच्या कामाचे स्वरूप समजून घेणे, आवश्यक कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करणे आणि संबंधित विभागाकडे योग्य मार्गदर्शन करणे आदी सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासह एजंटांकडून होणारी दिशाभूल रोखण्यास मदत होणार आहे.वाहनांच्या 42 सेवा फेसलेस

परिवहन विभागाच्या अधिकृत “parivahan.gov.in” (https://parivahan.gov.in) या संकेतस्थळावर वाहनधारकांसाठी विविध ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत. ‘वाहन’ (VAHAN) संगणकीय प्रणालीअंतर्गत एकूण 88 सुविधांपैकी 42 सेवा फेसलेस स्वरूपात दिल्या जात आहेत. वाहन हस्तांतरण, कर्जबोजा नोंद कमी करणे, ना हरकत दाखला आदी कामांसाठी उपलब्ध असलेल्या ऑनलाइन सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येतो.‘सारथी’ प्रणालीद्वारे 23 सेवा ऑनलाइन

वाहनचालक अनुज्ञप्तीशी संबंधित ‘सारथी’ (SARATHI) प्रणालीअंतर्गत एकूण २७ सुविधांपैकी २३ सेवा फेसलेस स्वरूपात उपलब्ध आहेत. यामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) घरबसल्या मिळविण्याची सुविधाही समाविष्ट आहे. तसेच अनुज्ञप्तीचे नूतनीकरण आणि अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल यांसारख्या कामांसाठी उपलब्ध ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येतो.या सुविधांमुळे अनेक कामांसाठी आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता कमी झाली आहे. नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी ई-मेल सुविधा,वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी आधार कार्ड आणि वाहनाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे स्वतःच्या ई-मेलवरून rto.46-mh@mah.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवावीत. या सुविधेमुळे संबंधित कामासाठी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज टाळता येऊ शकते.एचएसआरपी नंबर प्लेटसाठी ऑनलाइन नोंदणी,वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपाटी (HSRP) बसविण्यासाठी वाहनधारकांनी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करून प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करावी. एचएसआरपीसंदर्भातील तक्रारींसाठी संबंधित कंपनीच्या ग्राहक निवारण कक्षाशी ७४२८९६५२५२ या क्रमांकावर किंवा jitesh.malpani@RosmertaSafety.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

तक्रारींसाठी आरटीओशी संपर्क साधण्याचे आवाहन,वाहन आणि सारथी प्रणालीवरील प्रलंबित अर्ज, वाहन हस्तांतरण, कर्जबोजा नोंद कमी करणे, ना हरकत दाखला, शिकाऊ अनुज्ञप्ती, अनुज्ञप्तीचे नूतनीकरण तसेच अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल यांसंदर्भात काही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी rto.46-mh@mah.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा.नागरिकांनी केवळ प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असलेल्या कामांसाठीच आरटीओ कार्यालयात यावे आणि इतर कामांसाठी अधिकृत ऑनलाइन सेवांचा वापर करावा. तसेच वाहनांची कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी आणि वाहतूक नियमांचे पालन करावे. नागरिकांचा वेळ वाचविणे आणि रस्त्यावरील सुरक्षितता वाढविणे हा परिवहन विभागाच्या या प्रयत्नांचा उद्देश आहे.

000000

संबंधित पोस्ट

भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पॉन्ड, शेल्टर उभारण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावणेपाच कोटीचा निधी केला मंजूर– महानगरपालिका व 10 नगरपालिका /नगरपंचायत कार्यक्षेत्रात श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार

महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक देवस्थानांच्या शेकडो एकर जमीनीला धोका पोहोचवणारा- देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात अष्टविनायक मंदिरे एकवटली

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ जानेवारी२०११ पूर्वीचे निवासी प्रयोजनाचे अतिक्रमण नियमानुकुल करून घ्यावे- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी 

बंद्यांच्या कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा पुढाकार नांदेड जिल्हा कारागृहातील ४२ बंद्यांचे फार्मर आयडी तयार; २६ जणांचे कर्जमाफीसाठी ई-केवायसी अद्ययावत,बंदी कारागृहात, पण कुटुंबाच्या शेतीला शासकीय योजनांचे कवच!

vishwatmaklokswamivarta

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक आरोग्य सेवेला बळ; शस्त्रक्रियांची अचूकता आणि सुरक्षितता वाढणार

आर्चरी वर्ल्ड कपमध्ये ‘सुवर्ण’ भेद करणाऱ्या कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार