
दिल्ली हादरली! नराधम दोन महिने सावत्र मुलीवरच…
नवी दिल्ली प्रतिनिधी
देशाच्या राजधानीत कायदा आणि सुव्यवस्थेला काळं फासण्याचे प्रकार सतत घडत आहेत. यामुळे महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होतोय.शहरातील चिराग या ठिकाणी स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान या नराधमाने त्याच्या मुलीसोबतच जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन आहे.
IPC आणि POCSO कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
दिल्लीत महिलांवरील गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं?दिल्लीत महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण जगभरात सर्वाधिक आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान ते कमी झालं होतं. मात्र आता पुन्हा वाढ होत असल्याचा डेटा समोर आला आहे. राजधानीत महिलांवर बलात्कार आणि अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले.या वर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत 1,725 बलात्कार आणि 3,117 महिलांच्या अपहरणाची नोंद झाल्याची माहिती इंडिया टाइम्सने दिली आहे.



