vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निर्भय, निष्पक्ष निवडणुकासाठी सतर्क रहा -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

निर्भय, निष्पक्ष निवडणुकासाठी सतर्क रहा -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

राज्य प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर, :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखून निवडणूक प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात होण्यासाठी सतर्क रहा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीस पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार ,पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर ,निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे, ब्रिजेश पाटील, व्यंकट राठोड, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पदाधिकारी सर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते.

 

जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाचे तसेच लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 कलम (127 क ) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून संभाव्य उपद्रव वेळीच रोखावे.नामनिर्देशन प्रक्रिया, विविध सभा, प्रचार सभा, मतदान, मतमोजणी या सर्व टप्प्यावर पोलीस बंदोबस्ताचे योग्य नियोजन करावे. पोलीस विभागाने व संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने समन्वयाने हे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. समाज माध्यमावर अधिक लक्ष ठेवून पोस्ट किंवा मेसेज तसेच प्रसिद्धी माध्यमातून येणाऱ्या बातमीची दखल घ्यावी व तेढ निर्माण करणारे, बनावट, खोटी माहिती देणाऱ्या आशय, मजकूराबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त पवार म्हणाले की शहरांमध्ये सणाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवून सुरक्षितता व शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणेचा समन्वय उत्तम ठेवावा.

०००००००

संबंधित पोस्ट

साखर कारखान्यांनी लाभधारकांची पाणीपट्टी जमा करावी- कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार

vishwatmaklokswamivarta

आता राज्यात ‘लाडका शेतकरी अभियान’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

उपमुख्यमंत्री कार्यालय  जनसंपर्क कक्ष )१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष फिल्डवर उतरून उपाययोजना करावी आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हीसीद्वारे बैठक

महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अधिक सक्षम करणार    – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta