vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

जालना,द प्रतिनिधी: जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत (आरटीओ) बिगर परिवहन दुचाकी वाहनांच्या एमएच-21 सीक्यू या नवीन नोंदणी मालिकेतील आकर्षक व पसंतीचे वाहन क्रमांक वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील एमएच-21 सीक्यू- 0001 ते 9999 (MH-21 CQ-001 to 9999) हे क्रमांक दि. 2 नोव्हेंबर 2026 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत

पसंतीचा नोंदणी क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत राष्ट्रीयीकृत बँकेच्या धनाकर्षाद्वारे (डिमांड ड्राफ्ट) निर्धारित शुल्क, आधारकार्डाची स्वयंप्रमाणित छायांकित प्रत, पॅनकार्ड आणि भ्रमणध्वनी क्रमांकासह दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत.

आकर्षक क्रमांकांचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व परिवहन आयुक्तांच्या परिपत्रकानुसार करण्यात येणार आहे. एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येईल. अशा वेळी संबंधित अर्जदारांनी निर्धारित मूळ शुल्कासह वाढीव बोलीची रक्कम स्वतंत्र धनाकर्षाद्वारे सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित शुल्कापेक्षा सर्वाधिक रक्कम देणाऱ्या अर्जदारास संबंधित क्रमांक आरक्षित करून देण्यात येईल.

संबंधितांनी आपले धनाकर्ष उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्या नावे बंद लिफाफ्यात दि. 3 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावेत. त्यानंतर कोणत्याही सबबीवर धनाकर्ष स्वीकारले जाणार नाहीत. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येणार असून, यावेळी सर्व संबंधित अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनीष दौंड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित पोस्ट

केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते कोलकाता येथे ‘स्वच्छ मोबाईल ॲप’चे भव्य लोकार्पण 🇮🇳📱🧹

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), यांच्याकडुन  मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण 

राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम संपूर्ण साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर भर

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत रोजगार क्लस्टर उभारणीवर भर; स्थानिक उद्योगांसाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**आरमोरी येथे बारदाना निर्मिती उद्योगाच्या उद्घाटन*

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण, पाणीटंचाई निवारणाची कामे करावीत – जिल्हाधिकारी आशिष येरेकर