vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गडचिरोलीच्या शौर्याला राष्ट्रीय मंच; ३१ ऑक्टोबर रोजी एकता दिनाच्या परेडमध्ये २०० सी-६० कमांडो सहभागी होणार**जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण; ५० नागरिकही प्रत्यक्ष अनुभवणार सोहळा*

*गडचिरोलीच्या शौर्याला राष्ट्रीय मंच; ३१ ऑक्टोबर रोजी एकता दिनाच्या परेडमध्ये २०० सी-६० कमांडो सहभागी होणार**जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण; ५० नागरिकही प्रत्यक्ष अनुभवणार सोहळा*

गडचिरोली, प्रतिनिधी ऑक्टोबर (जिमाका) : माओवादविरोधी अभियानांमध्ये शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेची ओळख निर्माण करणारे गडचिरोली पोलीस दलाचे २०० सी-६० कमांडो ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील एकतानगर (केवडिया) येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरात ही परेड आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या सोहळ्यात सी-६० पथकाचा सहभाग गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

या परेडचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी जिल्ह्यातील निवडक ५० नागरिकही रवाना झाले आहेत. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी २७ ऑक्टोबर रोजी पथकाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले होते. देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात नागरिकांना देशाच्या सांस्कृतिक विविधतेचेही दर्शन घडणार आहेदीर्घकाळ माओवादाच्या आव्हानाला सामोऱ्या गेलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत सी-६० पथकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीत अभियानांदरम्यान जवानांनी दाखविलेले धैर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा ही जिल्हा पोलीस दलाची अभिमानास्पद ओळख आहे. राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडमध्ये हे जवान गडचिरोली पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि विकासाला चालना देण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी आणि त्यांना राष्ट्रीय महत्त्वाच्या सोहळ्याचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने ५० नागरिकांना परेड पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हा गडचिरोली जिल्हा पोलीस दलासाठी सन्मानाचा क्षण असल्याचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले. त्यांनी सहभागी जवानांचे आणि नागरिकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या कामकाजाला गती देऊ — उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

vishwatmaklokswamivarta

राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश ससून डॉक बाबत घेतली आढावा बैठक

प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये ‘वॉर्ड बाल संरक्षण समिती’ स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ समूहगानाचा नवा जागतिक विक्रम; 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा इतिहास