vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

ताडगाव येथे आदिवासी बहुउद्देशीय केंद्र, स्वर्गीय अजितदादा पवार उद्यान आणिअंगणवाडी केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न,सुधागड तालुक्यात विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून विकासाचा सुंदर मिलापआदिवासी बांधवांसाठी सुविधांचे नवे दालन खुले

ताडगाव येथे आदिवासी बहुउद्देशीय केंद्र, स्वर्गीय अजितदादा पवार उद्यान आणिअंगणवाडी केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न,सुधागड तालुक्यात विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून विकासाचा सुंदर मिलापआदिवासी बांधवांसाठी सुविधांचे नवे दालन खुले

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, रायगड यांच्या कार्यक्षेत्रातील सुधागड तालुक्यातील ताडगाव येथे आदिवासी बहुउद्देशीय केंद्र (MPC) यासह विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आदिवासी बहुउद्देशीय केंद्र, ग्रामपंचायत ताडगावच्या माध्यमातून साकारण्यात आलेले स्वर्गीय अजितदादा पवार उद्यान आणि महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले अंगणवाडी केंद्र या तीन महत्त्वपूर्ण सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विविध शासकीय विभागांनी समन्वयातून केलेल्या या विकासकामांमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांसाठी एकाच परिसरात विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सामुदायिक विकासाला चालना देण्यासोबतच महिला, बालके आणि ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेला हा परिसर स्थानिक विकासाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेया लोकार्पण सोहळ्यास माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले बहुउद्देशीय केंद्र हे स्थानिक आदिवासी बांधवांसाठी विविध उपक्रम, सामुदायिक कार्यक्रम आणि विकासात्मक कार्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय अजितदादा पवार उद्यानामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक सुंदर जागा उपलब्ध होणार आहे. अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून लहान बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणासह पोषण व बालविकासविषयक सेवांना बळकटी मिळणार आहे.

एका परिसरात तीन महत्त्वपूर्ण विकासकामांची उभारणी ही केवळ पायाभूत सुविधांची निर्मिती नसून, विविध शासकीय विभागांनी एकत्रितपणे काम केल्यास ग्रामीण आणि आदिवासी भागात सर्वांगीण विकासाची प्रभावी संधी निर्माण होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, रायगड यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण असून, ताडगावच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहे.

 

000000

 

संबंधित पोस्ट

अमृतच्या लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण सुरू

युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश; बारवाले महाविद्यालयात युवा संसद.

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांनी पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना व सेवांचा लाभ घ्यावा – देविदास कोकाटे दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुरवठादारांकडून निविदा मागविल्या

vishwatmaklokswamivarta

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम प्रवाश्यांच्या समस्या व तक्रार निराकरणासाठी प्रवासी राजा व कामगार पालक दिनाचे आयोजन

जनगणना’२०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारउपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन