vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालयात‘स्प्लॅश प्रोजेक्ट’ अंतर्गत पर्यावरणपूरक संरचनांचे उद्घाटन

देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालयात‘स्प्लॅश प्रोजेक्ट’ अंतर्गत पर्यावरणपूरक संरचनांचे उद्घाटन

 

ठाणे – प्रतिनिधी  समुदाय सहभाग कार्यक्रमांतर्गत स्प्लॅश प्रोजेक्ट, लंडन आणि QRT टीम यांच्या संयुक्त विद्यमाने देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालय, ठाणे येथे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक व आनंददायी संरचनांची उभारणी करण्यात आली. महाविद्यालयाचा परिसर अधिक प्रसन्न, संवादपूर्ण आणि पर्यावरणपूरक बनविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी श्री. पॅट्रिक, श्री. बेंजामिन आणि श्री. सेबॅस्टियन या टीम सदस्यांच्या सहकार्याने करण्यात आली. या संरचनांमुळे विद्यार्थ्यांना विश्रांती घेण्यासाठी, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी तसेच मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आनंददायी व उपयुक्त जागा उपलब्ध झाली आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी नगरसेवक डॉ. देवराम लक्ष्मण भोईर, नगरसेवक संजय देवराम भोईर, ज्येष्ठ नगरसेविका सौ. उषाताई भोईर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण पष्टे, व्यवस्थापकीय संचालिका ॲड. संजना भोईर, CDC सदस्य राजेंद्र शर्मा आणि स्प्लॅश प्रोजेक्टच्या महाविद्यालयीन समन्वयक सौ. जयश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या उपक्रमामुळे सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी शाश्वत, पर्यावरणपूरक आणि आनंददायी वातावरण निर्माण करून महाविद्यालयीन जीवन अधिक समृद्ध करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण व स्तुत्य प्रयत्न ठरला आहे.

00000

संबंधित पोस्ट

नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

राज्यपालांकडून लोकभवन येथे ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित

vishwatmaklokswamivarta

आंदोलकांना अमानुष मारहाण: कापूरबावडी पोलीस स्टेशनसमोर जोरदार आंदोलन# दलित तरूणांना मारहाण करणाऱ्यांवर एट्रोसिटी नुसार गुन्हा नोंदवा – मनोज प्रधान

vishwatmaklokswamivarta

उपतालुकाप्रमुख अर्जुन पाटील -ठोंबरे यांच्या संघर्षाला यश;स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटी सुरू-माहोरा – बरंजळा साबळे – नळणी – जवखेडा ठोंबरे – केदारखेडा – राजूर –तळेगाव – फुलंब्री मार्गावरील हजारो नागरिकांना दिलासा; जवखेडा ठोंबरे नगरीत येथे चालक-वाहकांचा जाहीर सत्कार

बनावट कागदपत्रांद्वारे जालन्यातील सर्व्हे ५५४ मधील 5 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न उघडकीस,न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन भूमी अभिलेख अधीक्षक व दुय्यम निबंधकासह ५ जणांवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ