vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ

माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ..

मुंबई, प्रतिनिधी: माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1981 कलम 6 अन्वये स्थापित विविध सुरक्षा रक्षक मंडळे व महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 कलम 6 अन्वये स्थापित विविध माथाडी मंडळे यांचे आस्थापनेवरील सेवाप्रवेश नियम शासन परिपत्रक क्र.युडब्लूए-2016/प्र.क्र.01/कामगार-5, दिनांक 11 फेब्रुवारी, 2021 नुसार खालील संवर्गातील एकूण 22 माथाडी मंडळे व 12 सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक संवर्गातील पदांच्या सरळसेवा पद्धतीने गट-क मधील रिक्त पदे भरती जाहिरात 13.05.2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे

त्यानुसार उमेदवारांचे अर्ज 11.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत यशस्वीपणे दाखल झाले असतील अशा उमेदवारांना अर्जाचे परीक्षा शुल्क भरण्याकरिता 12.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली होती. तथापि, शुल्क भरण्याकरिता काही तांत्रिक अडचणी उमेदवारांना येत असल्यामुळे शुल्क भरण्याच्या कालावधीमध्ये 18.06.2026 रोजी23.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. ही मुदतवाढ 11.06.2026 रोजी पर्यंत अर्ज भरण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ शुल्क भरण्याकरिता देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी, असे सह आयुक्त कामगार तथा सदस्य सचिव, माथाडी व सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया समिती, मुंबई यांनी कळविले आहे.

अधिक माहितीकरीता https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

बुलढाण्यात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत; डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप-विकासकामे वेगाने पुढे नेण्याचा संकल्प-डॉ.प्रविणकुमार देवरे

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

vishwatmaklokswamivarta

रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल..

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

अन् अंबडच्या जिल्हा परिषद शाळेत १९७२ च्या आठवणींना उजाळाअंबड जि.प. प्रशालेच्या १९७२ चे गेटू-गेदर :१९७२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन..

vishwatmaklokswamivarta

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta