vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

जगासमोर  ओमिक्रॉन : अमेरिका सावध; 4 रुग्ण आढळताच प्रवासावर लावले निर्बंध…..

जगासमोर  ओमिक्रॉन : अमेरिका सावध; 4 रुग्ण आढळताच प्रवासावर लावले निर्बंध…..

विशेष प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या मोठ्या संकटातून जग बाहेर पडत असतानाच पुन्हा कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरीअंटने जगभरासाठी चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. जगातले प्रगत देश म्हणून पाहिलं जाणाऱ्या अमेरीकेसारख्या देशांनाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसला होता. मात्र यंदा सर्वच देशांकडून खबरदारीच्या उपयांचा अवलंब केल्याचा जात असल्याचं दिसतं आहे. अमेरिकेत देखील आता ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळून आल्यानंतर व्हाईट हाऊसकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने देशातील २९ च्या जवळपास देशांमध्ये शिरकाव केला आहे. सुरुवातील दक्षिण आफ्रिकेसारख्या जोखीम असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. प्रवाशाचे कोरोना लसीकरण झाले असेल आणि जोखीम नसलेल्या देशातून प्रवासी अमेरिकेत जात असेल तरी त्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वत: या मुद्याची गंभीर दखल घेतली असून, देशातील आणि देशाबाहेरील प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार आता अमेरिकेत कुठेही प्रवास करण्यासाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. प्रवास करताना लसीकरण आणि प्रवासाबद्दलची माहिती देणे आवश्यक असणार आह

दरम्यान, गुरुवारी अमेरिकेत देखील पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर तिथे आणखी चार ते पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अमेरिकिने निर्बंध आणखी कडक केले आहेत.

 

संबंधित पोस्ट

व्हेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’ नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट..

ऑस्ट्रेलियामध्ये दोन जुळ्या बहिणींना एकाच नवऱ्याकडून एकाच वेळी व्हायचे गर्भवती…

vishwatmaklokswamivarta

तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यानंतर अफगाण मुलींच्या अल्पवयीन विवाहात वाढ; अहवालात धक्कादायक खुलासा. .

vishwatmaklokswamivarta

अखेर मालदीवने घेतले झुकते माप; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतामध्ये करणार रोडशोज-

पोर्शे, ऑडीसह ४००० अलिशान गाड्यांचे जहाज समुद्रात जळून खाक; अब्जावधींचे नुकसान….

vishwatmaklokswamivarta