vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

शनिवार, 4 डिसेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण2021  होणार

  सूर्यग्रहण 2021 | भूक आवरत नाही? ग्रहण उपाय करा आणि निर्धास्त राहा

प्रतिनिधी : बई: शनिवार, 4 डिसेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण2021  होणार आहे. हे ग्रहण सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि दुपारी 03:07 पर्यंत राहील. ग्रहणाच्या काळात वातावरण प्रदुषित होते. त्यामुळे या काळात अन्नपदार्थ खाणं धोकादायक मानलं जाते. पण काही लोकांना भुक आवरात नाही. भुकेच्या आभावी त्यांना काही गोष्टी सुचत नाहीत. अशातच जर तुम्हाला खायचे असेल तर तुमच्या साठी एक उत्तम पर्याय आहे.

गर्भवती महिला, लहानमुले यांना भूक आवरत नाही तेव्हा तुम्ही हा उपाय करु शकता. 4 डिसेंबर रोजी होणारे ग्रहण भारतातून जरी दिसणार नसेल तरी त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. या काळात तुम्हाला काही खायचे असल्यास खाली दिलेला उपाय नक्की करुन पाहा.

ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांच्या मते सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यां दोघांचाही परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो.ग्रहणामध्ये वातावरण अशुद्ध होऊन सर्वकडे नकारत्मकता पसरते. सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी आणि चंद्रग्रहणाच्या 9 तास अधिपासूनच हा काळ सुरू होतो. यालाच ज्योतिषीशास्त्रात सुतकाचा काळ असे म्हटले जाते. शास्त्रात सुतक ते ग्रहण संपेपर्यंतचा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या काळात खाणे-पिणे, पूजा इत्यादी निषिद्ध मानले जातात. मात्र, काही नियमांनुसार आजारी आणि गर्भवतींना सूट देण्यात आली आहे. पण असे करतानाही काही नियम पाळणे गरजेचे असते.

अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने ठरतात वरदान

वैज्ञानिकदृष्ट्या, ग्रहणाच्या वेळी वातावरणात उपस्थित असलेल्या किरणांचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होत असतो. या वातावरणाचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो. आपल्या अन्न पदार्थांच्या मार्फत ही किरणे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात. पण अन्न पदार्थांमध्ये तुळशीचे पत्र वापरल्यास हा धोका कमी होतो. तुळशीच्या पनांमध्ये पारा असल्यामुळे आपल्या शरीराला कमी धोका पोहचतो. पुराणांमध्ये अशी मान्यता आहे की तुळशीची पाने ज्यामध्ये टाकली जातात ती गोष्ट शुद्ध होते. त्यामुळे ग्रहणाच्या काळात तुम्ही याचा वापर करु शकतो.

संबंधित पोस्ट

महाशिवरात्री*15 फेब्रुवारी -2026*यंदाची महाशिवरात्री: भक्तीकडून मुक्तीकडे…”*का करावी महाशिवरात्रीला विशेष पूजा?*

vishwatmaklokswamivarta

गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष- अवधूत म्हणजे काय ?

*✨ श्री गुरुदेव दत्त* ✨ 

vishwatmaklokswamivarta

आकाशात पाहायला मिळाला दुर्मिळ योग; चंद्राच्या मागे अदृश्य झाला सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र…

साधकांसाठी महत्वाचे….

vishwatmaklokswamivarta

श्रीरामाचा लहान भाऊ *शत्रुघ्न* वर एक लेख वाचण्यात आला तो तुम्ही पण वाचावा असं मला वाटते.

vishwatmaklokswamivarta