vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

*✨ श्री गुरुदेव दत्त* ✨ 

*✨ श्री गुरुदेव दत्त* ✨

*दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे* *नेमकं काय ? सगुण आणि साकार दर्शन दिले तरच त्याला अनुभूती म्हणायचे का ? कि स्वप्नात येऊन काही सांगितले त्याला अनुभूती म्हणायचे ? अनुभूती म्हणजे एक असा अनुभव जो केवळ चित्ताला प्रमाण होतो ,ग्राह्य होतो .*

 

*दर्शन दिले तर ती निश्चितच मोठी अनुभूती आहे पण केवळ दर्शन म्हणजेच अनुभूती नाही . दत्त महाराजांचे नाम घेण्याची बुद्धी होणे ,ते घ्यावे हे चित्ताला वाटणे* *हि देखील अनुभूतीच आहे . त्यांचे कोणत्याही प्रकारे स्मरण होणे ,त्यांच्या एखाद्या क्षेत्राला जावे असे वाटणे ,त्यांच्या नाना* *लीलांचे अवलोकन होणे ,एखाद्या ग्रंथाचे पारायण ,वाचन होणे तात्पर्य दत्त महाराजांशी निगडित काहीही होणे हि अनुभूतीच आहे* .

 

*अहो मला दत्त महाराज प्रिय आहेत हि गोष्ट आणि दत्त महाराजांना मी प्रिय आहे हि गोष्ट* —- *यात जमीन अस्मानाचा फरक आहे . अनुभूती म्हणजेच दत्त महाराजांना आपण प्रिय होणे आणखी काही नाही* .

 

*झाडाचे पान देखील त्यांच्या इच्छेशिवाय हालत नाही तेव्हा* *त्यांचे स्मरण होणे म्हणजेच चित्ताला दत्त महाराजांनी दिलेली चालना आहे हे निश्चित ,तेव्हा नित्य त्यांच्या कथांचे ,लीलांचे स्मरण होणे ,वाचन होणे .चिंतन* *मनन होणे हि सर्व लक्षणे म्हणजे दत्त महाराजांना आपली कायम आठवण असल्याचीच द्योतक आहेत* .

*मात्र अनेकदा ह्या उपासनेत विघ्ने कायम अडसर बनू पाहतात .कथा कादंबरी वाचताना* *होणारी उल्हसित चित्तवृत्ती गुरुचरित्र वाचनावेळी आळसावते ,जांभया येऊ* *लागतात ,डोळे मिटू लागतात .वाचनाची उरलेली पाने किती याचा बुद्धी वेध घेते .जोरजबरदस्तीने केलेली* *उपासना फलद्रुप का होत नाही तर चित्त वाचनात नसताना आपण केवळ शब्दांचा वेध घेत असतो* .

 

*अगदी थोडक्यापासून सुरुवात करावी .लिलांच्या कथा वाचा ,नामस्मरण होऊ द्या ,एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन* *या ,हळूहळू हे सर्व वाढत जाईल म्हणून थोरले महाराज म्हणत पाच ओव्या तरी रोजच्या चुकवू* *नका ,ते नित्य पारायण करा का म्हणाले नाहीत तर किती होते यापेक्षा नेमाने काहीतरी होते याला महत्व आहे . यासाठी पुन्हा* *दत्त महाराजांचीच प्रार्थना करून म्हणायचे कि अहो केवळ तुमची* *आठवण व्हावी यावर मला मर्यादित न ठेवता नित्य नवविधेची पात्रता येऊ द्या ,कायम सान्निध्य द्या* .

 

*श्री गुरुदेव दत्त !!!*श्री स्वामी समर्थ !!*

संबंधित पोस्ट

🌺🌿🌺 १० फेब्रुवारी – अखंड समाधानाचा मार्ग : नामस्मरण: वृद्धांना उपदेश. 🌺☘🌺

vishwatmaklokswamivarta

              ‼️ *प्रवचन*‼️ *श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*   *३१ मे*

स्वामी समर्थांच्या पादुकांचा सोमवारी साताऱ्यात दर्शन सोहळा…

vishwatmaklokswamivarta

वीरशैव म्हणजे लिंगधारी शिवभक्त. पूर्वी यांना वीरमाहेश्वर म्हणत. ‘ सिद्धांतशिखामणी ‘ ग्रंथानुसार, ‘ विद्याया रमते यस्मान्मायां हेयां श्ववद रहेत | अनेनैव निरुक्तेन वीरमाहेश्वर: स्मृत:

श्री स्वामी समर्थ🌹

vishwatmaklokswamivarta

प्रत्येकाने गुरु केलाच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप श्रीहरी रसाळ महाराज यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta