
सीडीएस बिपीन रावत उत्कृष्ट सैनिक, खरे देशभक्त होते”- पतंप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली प्रतिनिधी : भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचा तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये १४ जण प्रवास करत होते. यामध्ये रावत यांच्या पत्नीचाही समावेश होता. या सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्घनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
राष्ट्रपती म्हणाले, जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला धक्काच बसला तसेच मी आतून उद्ध्वस्त झालो. देशानं एक शूर सुपुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चाळीस वर्षांची निःस्वार्थ सेवा दिली. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सद्भावना व्यक्त करतो. आपलं कर्तव्य निभावत असताना हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेल्या सर्वांना मी देशवासियांच्यावतीनं अभिवादन करतो.
पंतप्रधान म्हणाले, जनरल बिपीन रावत हे उत्कृष्ट सैनिक, खरे देशभक्त होते. देशाचं सैन्य दलांचं आणि सुरक्षा व्यवस्था आधुनिकीकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रणनीतीवर त्यांची दूरदृष्टी आणि दृष्टीकोन हा अपवादात्मक होता. त्यामुळं त्यांचं आपल्यातून जाणं हे माझ्यासाठी अतिव दुःखदायक आहे. ओम शांती!
बिपिन रावत यांचं बुधवारी दुपारी तामिळनाडूमध्ये Mi-17V5 हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते. या अपघाताच्या चौकशीचे आदेश हवाई दलाने दिले आहेत. बिपिन रावत यांच्यासोबत १४ जण प्रवास करत होते. यामध्ये त्यांची पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि हवाई दालाचे पायलट होते. या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला आहे.



