vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

एसटी कर्मचारी, महा वकास आघाडी आणि प्रवाशांसाठी महत्त्वाचा दिवस, मुंबई हायकोर्टात संपावर सुनावणी..

एसटी कर्मचारी, महा वकास आघाडी आणि प्रवाशांसाठी महत्त्वाचा दिवस, मुंबई हायकोर्टात संपावर सुनावणी….

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या  एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप प्रकरणावर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी, ठाकरे सरकार आणि प्रवाशांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीच्या निमित्तानं शेकडो एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती समोर आलीय.

आजच्या सुनावणीकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा

आज उच्च न्यायालयात संपाबद्दल असलेल्या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने ३ नोव्हेंबर रोजी पुकारलेला संप अद्याप सुरूच आहे. उच्च न्यायालयाने एसटीच्या विलीनीकरणावर राज्य शासनाला समिती गठीत करण्याचे आदेश देऊन प्राथमिक अहवाल 20 डिसेंबर रोजी मागितला होता.

राज्य सरकार प्राथमिक आज अहवाल सादर करणार

महाराष्ट्र सरकारनं हायकोर्टाच्या आदेशानं विनलीनीकरणासंदर्भात समिती स्थापन केली होती. आज या समितीचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीत नेमकं काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

पगारवाढीनंतरही संप सुरुच

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्ता, एचआरए वाढ, वेळेवर अशा मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपांची हाक दिली होती. त्यानंतर राज्य सरकारनं प्रथम महागाई भत्ता, एचआरएमध्ये वाढ केली होती. एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाहता राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ जाहीर केली. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात कामावर परतलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार देखील करण्यात आला. मात्र, विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे

संबंधित पोस्ट

बुलडाणा जिल्ह्यातील लोकहिताची विविध कामे तातडीने मार्गी लावावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सिंचन, औद्योगिक, रस्ते, पर्यटनांच्या कामांना गती देण्याचे निर्देश

नाताळ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा,राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद मध्ये लाखो वारकऱ्यांच्या रुपात गोदाकाठी अवतरलं नवचैतन्य,  नाथषष्ठी उत्सावासाठी 4 लाखांहून अधिक भाविक…

vishwatmaklokswamivarta

एआरटी सेंटरला 20 वर्षे पूर्ण*उत्कृष्ट कार्याबद्दल कर्मचाऱ्यांचा गौरव

राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा जोर वाढणार, कोकणाला रेड अ‍ॅलर्ट…

नारायण राणे  राज ठाकरेंना बाहेर का पडावं लागलं; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta