vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

औरंगाबाद मध्ये लाखो वारकऱ्यांच्या रुपात गोदाकाठी अवतरलं नवचैतन्य,  नाथषष्ठी उत्सावासाठी 4 लाखांहून अधिक भाविक…

औरंगाबाद मध्ये लाखो वारकऱ्यांच्या रुपात गोदाकाठी अवतरलं नवचैतन्य,  नाथषष्ठी उत्सावासाठी 4 लाखांहून अधिक भाविक…

 

औरंगाबाद प्रतिनिधी

राज्यभरातून आलेल्या दिंड्यांमधील भाविकांनी गोदावरी वाळवंट, यशवंतनगर, भानुदासनगर, लक्ष्मीनगर, कावसनकर स्टेडियम, पंचायत समिती परिसर, नाराळा, गागाभट्ट चौक, संतपीठ, यात्रा मैदान आदी ठिकाणी 300 हून अधिक राहुट्या उभारण्यात आल्या आहे. तीन दिवस यांचा पैठणमध्ये मुक्काम आहे, अशी माहिती वारकरी संप्रदायाचे दिनेश पारीक यांनी दिली कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आसुसलेला गोदाकाठ  जणू विविध रंगांनी आज फुलून गेलाय.   नाथषष्ठी उत्सवासाठी लाखो भाविक दाखल झाले असून त्यांच्या रुपानं साक्षात नवचैतन्यच जणू पैठण नगरीत अवतरल्याचं चित्र सध्या दिसून येतंय. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही 500 पेक्षा जास्त दिंड्या पैठणमध्ये ) दाखल झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी चार लाखांवर भाविकांनी संत एकनाथ महाराज () यांच्या समाधी मंदिरात दर्शन घेतले तर 300 पेक्षा जास्त राहुट्यांनी गोदाकाठ रंगला आहे. हातात भगवा ध्वज, गळ्यात तुळशमाळ, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखात भानुदास एकनाथाचा जयघोष, हाताने टाळ-मृदुंगांचा गजर करीत शहराच्या रस्त्यांवरून दिंड्या मंदिराकडे जात होत्या.

अभंगाच्या तालावर मानाची दिंडी मंदिराकडे

बुधवारी गावातील नाथमंदिरातून नाथ वंशज आणि मानकऱ्यांची मानाची निर्याण दिंडी पारंपपरिक अभंगांच्या गजरात काढण्यात आली. या दिंडच्या अग्रभागी सजवलेला रुबाबदार अश्व, झेंडेकरी त्यानंतर विणेकरी, अमृत संस्थानची छत्री, नाथवंशजांच्या छत्र्यानंतर संस्थानिक अंमळनेरकर महाराजांची दिंडी, भगवान गडाची दिंडी व सर्वात शेवटी वारकरी अशा क्रमाने अभंगाच्या तालावर मार्गक्रमण करण्यात आले. मानाची ही दिंडी गावातील नाथमंदिरातून निघून बाहेरील नाथमंदिरात नेण्यात आली.

संबंधित पोस्ट

मतदान शांततेत पार पडावे म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश-7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होणाऱ्या मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टोरंटस आणि बार इत्यादी आस्थापनांमध्ये आगीपासून बचावासाठी पुरेशा उपाययोजना आहेत किंवा नाहीत याची तपासणी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल विशेष अग्निसुरक्षा मोहीम राबवत आहे

vishwatmaklokswamivarta

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

ह्युमन मेटान्यूमो व्हायरस संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर;-नागरिकांनी घाबरुन न जाता सूचनाचे पालन करावे – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

मुंबईतील धारावीकरांना ५०० चौरस फूट घरासाठी! बाबुराव माने लढणार – बाबुराव माने जिंकणार !

vishwatmaklokswamivarta

राज्यभरात घराघरांमध्ये तसंच सार्वजनिक ठिकाणी रोषणाई, ढोल-ताशांच्या गजरात मानांच्या गणपतींचं होत आहे आगमन.