vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

रुग्णानुभव 💐 ओयासिस

रुग्णानुभव 💐 ओयासिस

प्रतिनिधी आरोग्य

२०१० च्या मे महिन्यात झालेल्या माझ्या अपघाताने सर्व घर हादरले होते.

 

कारण उजवा पाय पोटरी पासुन फ्रँक्चर झाला होता, चेह-याच्या उजव्या बाजूला डोळा बाहेर आलेला असुन १३ फ्रँक्चर होते, झायमँटिकल आर्च, जॉ डिसलोकेट आणि मेंदूला ४०% सूज असे निदान होते.

 

नगरमधील डॉक्टर मंडळी एकतर आधीच हुशार. कारण नोबेल हॉस्पिटलमध्ये असुनही त्यांनी चेह-याची सर्जरी करुन प्लेट टाकाव्या लागतील असे सांगण्याची तसदी त्यांनी घेतली नव्हती.

 

त्यावेळी मात्र एवढेच सांगण्यात आले की, शक्यतो उजव्या बाजूने खाणे टाळावे. पण नगरमध्ये नोव्हेंबर नंतर वाईट थंडी पडत असते तेव्हा उजवी बाजूचा चेहरा सुजत असे, थडथड उडत असे.

 

२०१० ते २०१९ जवळपास ५० वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवून झाले. काही काळ गुण येत असे पण नंतर पहिले पाढे ५५ च. एका खुप चांगल्या डॉक्टरने तर हे सांगितले की, हा त्रास तुम्हाला वैकुंठात जात नाही तो पर्यत होत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हसत हसत दु:खाकडे बघण्याचा सराव करावा. डॉक्टर पुणे येथील आहे पण २०२० पर्यत ते खरे आहे याचा प्रत्यय मी दररोज घेत होतो.

 

एकतर या सर्व प्रकाराने डोकं वाईट दुखत असे, उजव्या बाजूचा चेहरा सारखा उडत असे, फ्रँक्चर दुखत असे, उजव्या बाजूचे दात बधीर होते त्यामुळे जर कधी त्याबाजूने खाण्याचा प्रयत्न केला तर गाल कधी कधी चावला जात असे. या सर्व प्रकारात एकपात्री, मालिका, चित्रपट, नोकरी, प्रपंच हे प्रकार अव्याहत सुरु होतेच. थंडीमध्ये तर भातवरण देखील मिक्सरमधुन काढून खावा लागत असे. मालिकेच्या चित्रिकरणा दरम्यान दाढी उजव्या बाजूला नीट चिकटत नसे किंवा स्पिरिटगम जास्त लावावा लागत असे. जिथे चेह-याच्या उजव्या बाजूला संवेदनाच नव्हत्या तिथे मी ही हतबल होतो. जगण्याची इच्छाच जणू काही विझण्याची लक्षणे दिसत होती.

 

या सर्व प्रकारात २०१९ साली नगरमधील मेघाग्नी चौकातील प्रकाशपुर येथे एकपात्री प्रयोग नाताळानिमित्त घेतला होता. तिथे अशोक बकोरे यांच्या घरी मला प्रयोगाच्या आधी बसण्यास सांगितले होते. घरी गेल्यावर बकोरे सरांचे घर प्रथमदर्शनी बघता लक्षात आले की, हा सद् गृहस्थ आयुर्वेदिक वस्तूंचा वापर करणारा दिसत आहे म्हणुन. कारण मी चहा प्रयोगाच्या आधी घेत नाही म्हणाल्यावर त्यांनी एक आयुर्वेदिक चहा मला प्यायला दिला. चहा तर छान होताच पण तोंडाला चवही आली. काय काय आहे ते जवळपास मी बकोरे सरांच्या ७५% बरोबर होतो.

 

बोलता बोलता माझ्या अपघाताचा विषय निघाला. त्यावेळी त्यांनी मला त्यांनी लिहिलेलं पुस्तक मृत्यूवर विजयी स्वारी हे पुस्तक दाखविले, तेव्हा लक्षात आले की बकोरे सर हे वैद्यकीय मार्गदर्शक वा समुपदेशक आहेत म्हणुन. सर्व अपघाताचा प्रकार आणि आत्तापर्यत किती डॉक्टरांकडे गेलो हे ऐकल्यावर अशोक बकोरे सर म्हणाले, “हे बघ, आत्तापर्यत तु ब-याच डॉक्टरांकडे जाऊन आलास. मी म्हणतो आहे म्हणुन मात्र २ महिने माझी ट्रिटमेंन्ट घे जर तुझी इच्छा असेल तर…! मी जी ट्रिटमेंन्ट देणार ती आयुर्वेदिक आहे त्यामुळे याला कमीत कमी २ महिने द्यावेच लागतील आणि आयुर्वेदिक असल्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट नाही. बघ आणि सांग मला.”

 

दुस-या दिवशी मी आणि योगिनी दोघेही अशोक बकोरे सरांकडे गेलो. योगिनी सरळ अशोक बकोरे यांना म्हणाली, “आजपर्यत आम्ही अनेक डॉक्टर केले. ज्यांनी जे जे सांगितले, ते ते सर्व उपाय करुन झाले. तेव्हा तुम्ही म्हणत आहात ते सर्व करुन बघायला हरकत नाही. फायदा नाही झाली तरी आयुर्वेदिक औषधे असल्यामुळे नुकसान मात्र नक्कीच होणार नाही. ज्या दिवशी माझ्या नव-याला बरे वाटेल त्याला थंडीत जबडा दुखण्याचा त्रास होणार नाही, चेहरा सुजणार नाही, त्याला व्यवस्थित खाता पिता येईल, डोके दुखणार नाही, मिक्सर मधुन बारीक न करता अन्न खाता येईल त्यादिवशी मी तुम्हाला मानलं!”

 

सर्व काही तब्येतीची माहिती सरांनी घेतली. त्यावेळी चेह-यापेक्षा अपघाताच्या काळात जी काही पेनकिलर दिली होती त्यानेच किडणीला सूज आली होती, कोलायटिस झाला होता, लिव्हरला सूज होती.

 

या सर्व प्रकारावर अशोक बकोरे सरांनी १ महिन्याची आयुर्वेदिक औषधे सुचविली. दर शनिवारी किंवा रविवारी न विसरता बकोरे सरांचाच फोन येत असे. काय परिणाम होत आहेत किडणीवर, आतड्यांवर, लिव्हरवर यांची चौकशी ते सतत करत असे. १ महिन्यानंतर जरा लिव्हर, मोठे आतडे, किडणी यांना थोडा गुण आला होता. परत १ महिन्याची औषधे बकोरे सरांनी सुचविली.

 

वाढदिवसाच्या दिवशी फेब्रुवारीच्या मध्यावर अशोक बकोरे यांच्याकडे गेल्यावर त्यांनी कागदावरील माहिती बघितली आणि विचारले की, “बाबा, आता चेह-यावर सुज आहे का ? दुखतो आहे का ? दात बधीर आहेत का उजव्या बाजूचे ?”

 

मी सहज मागील दोन महिन्याचा विचार केला तर लक्षात आले की, दुखणे कधी बरे झाले हेच कळाले नाही. डोळे अनाहूनपणे पाण्याने भरुन आले होते. नकळत मी अशोक बकोरे यांच्या पाया पडलो. ते म्हणाले मी निमित्तमात्र आहे रे. तु औषधे जी मी सुचविली ती सांगितल्या नुसार घेतली आणि जे पथ्य सांगितले ते पाळले याचा परिणाम आहे हा.

 

ज्या ट्रिटमेंन्टसाठी ९ वर्ष महाराष्ट्रात अनेक डॉक्टरांकडे फिरलो पण गुण आला नाही, तो गुण एका कलेच्या प्रयोगामुळे आला.

 

या घटनेला आता जवळजवळ २ वर्ष झाले, पण थंडी अगदीच म्हणजे ३ किंवा ४ं अंश होते तेव्हाच तोही थोडाच चेहरा दुखतो. पण आता काही त्रासच राहिला नाही चेह-याचा.

 

जर आपणही अश्याच एखाद्या दुखण्याला कंटाळले असाल तर एकदा आयुर्वेदिक मार्गदर्शक वा समुपदेशक अशोक बकोरे यांची भेट अवश्य घ्यावी.

 

त्यांचा पत्ता आणि फोन नंबर आपल्याला देत आहे. मला जसे आयुष्याचे ओयासिस मिळाले तसे तुम्हाला देखील लाभो, हिच स्वामींचरणी प्रार्थना !

 

अशोक बकोरे,

684 सिव्हिल हडको,

क्रांती चौक, गांधी स्टॅम्प मागे,

सावेडी रोड, अहमदनगर. 7350473434, 9822844014,

संबंधित पोस्ट

बाजरी खाण्याचे फायदे* 

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक व उच्चक्षमतेची सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta

कर्करोग जनजागृती मोहिमेस गती द्या – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यातील 22 जिल्ह्यांतील 396 गावांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव; 56 संक्रमित जनावरांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta