vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी दिल्लीतील जिल्हा न्यायालयात ऐतिहासिक निकाल, आईने साक्ष दिली अन् मुलास 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली…

नवी दिल्लीतील जिल्हा न्यायालयात ऐतिहासिक निकाल, आईने साक्ष दिली अन् मुलास 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी- दारू पिऊन आपल्या आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी एका खटल्यात जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. दारू पिऊन गोंधळ घातला आणि आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायाधीश त्रिभूवन यादव यांनी आरोपी मुलास 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, 1 लाख रुपये आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे.

आरा टाऊन पोलीस हद्दीतील शीतल टोला परिसरातील ही घटना आहे. यातील आरोपीचे नाव आदित्यराज ऊर्फ बिट्टू असून आईनेच त्याविरुद्ध पोलीस तक्रार केली होती. शीतल टोला निवासी रामावती देवी यांनी 10 जून 2021 रोजी शहर पोलीस ठाण्यात मुलगा आदित्यविरुद्ध तक्रार दिली होती. त्यामध्ये, मुलगा आदित्यने दारुच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करुन त्यांना खोलीत डांबून ठेवल्याचे म्हटले होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आई-वडिलांची सुटका केली. तसेच, नशेत असलेल्या आदित्य उर्फ बिट्टूला ताब्यात घेतले होते. त्यानंतर, वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला तुरुंगात टाकण्या आले.

पोलीस एफआयआरमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार, मुलाने मारहाण करुन आईकडील पैसही घेण्याचा प्रयत्न केला होता. एक्साईजचे अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले की, याप्रकरणी आरोपी मुलाच्या आईनेच कोर्टात जबाब दिला होता, तर तीन पुरावेही सादर केल होते. तसेच, पोलीस तपास अधिकारी नीता कुमारी यांनीही न्यायालयासमोर आपला जबाब नोंदवला होता. विशेष म्हणजे आरोपीच्या बाजुने लढण्यास एकही वकील पुढे आला नाही. 

संबंधित पोस्ट

केंद्र सरकारला सर्वोच्च दणका; पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सुप्रिम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने होणार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती

पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक,काँग्रेसला राष्ट्रवादीची हाक; अन्यथा एकला चलो रे.

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे पाटील यांची शेतकरी आत्महत्या कुटूंबास भेट

२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे ३ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनविकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरविणे विषयावर चर्चा..

दि.13 ते 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीत-निवडणूक निकालाचे अंदाज प्रसारित करण्यास प्रसारमाध्यमांना प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

झुडपी जंगलावरील जमिनीबाबत समन्वयाने कामाला गती द्या – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta