vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

दलित पँथरचे अध्यक्ष यशवंत नडगम यांचा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश

दलित पँथरचे अध्यक्ष यशवंत नडगम यांचा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश*

 

मुंबई प्रतिनिधी- दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या नेतृत्वातील दलित पँथर मध्ये काम केलेले आणि आता दलित पँथर च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेले यशवंत नडगम यांनी आज केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे आशीर्वाद घेऊन यशवंत नडगम यांनी त्यांच्या समर्थकांसह आज पुण्यात रिपाइं मध्ये प्रवेश केला.

 

रिपब्लिकन ऐक्यासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले नेहमी अनुकूल भूमिका घेत राहिले आहेत. संघर्षनायक ना.रामदास आठवले हे केवळ रिपब्लिकन पक्षाचे नव्हे तर संबंध समाजाचे ; संपूर्ण देशाचे नेते आहेत. त्यामुळे रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आज रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला आहे असे मनोगत दलित पँथर चे अध्यक्ष यशवंत नडगम यांनी सांगितले. यावेळी दलित पँथरचे यशवंत नडगम यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. महाराष्ट्रातील दलीत पँथर चे शेकडो कार्यकर्ते आपल्या सोबत रिपब्लिकन पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती यशवंत नडगम यांनी दिली. यशवंत नडगम हे चांगले क्रियाशील कार्यकर्ते असून त्यांना रिपब्लिकन पक्षात सन्मानाचे स्थान देण्यात येईल असे ना.रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपाइं चे पुणे शहर अध्यक्ष शैलेश चव्हाण; परशुराम वाडेकर; उपमहापौर सुनीता वाडेकर; असित गांगुर्डे ऍड.आयुब शेख; ;हनुमंत साठे;मंदार जोशी; बाळासाहेब जानराव; महिपाल वाघमारे; संगीता आठवले;शशिकला वाघमारे ; हलीमा शेख; सचिन वाघमारे; नियती शिंदे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्ष नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन बारामतीतील निवासस्थानी शोकसंवेदना व्यक्त केल्या

vishwatmaklokswamivarta

पोलिसांच्या घरांसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून विशेष धोरण लवकरच.

vishwatmaklokswamivarta

नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामत आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील…

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेलउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण, एक देश एक निवडणूक, जालना लाठीचार्ज या मुद्द्यांवर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष नेते शरद पवार

vishwatmaklokswamivarta