vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

धार्मिक नेता बाबा कालिचरण ,याविरोधात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिसांत विरोधात गुन्हा दाखल केला.

धार्मिक नेता बाबा कालिचरण ,याविरोधात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिसांत विरोधात गुन्हा दाखल केला.

ठाणे : प्रतिनिधी धार्मिक नेता बाबा कालिचरण याने रायपूर येथील धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात गरळ ओकली होती. याविरोधात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिसांत कालिचरणविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर “आता फॅसिझमविरोधात मैदानात उतरुन लढावचं लागेल,” असं ट्वीटही आव्हाड यांनी केलं.

आव्हाड म्हणाले, “फॅसिझमविरुद्ध मैदानात उतरून लढावंच लागेल. गोडसेच्या पाठिराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. मी स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता बाबा कालीचरणविरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवायला चाललो आहे. ही विचारांची लढाई आहे”

 

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. रायपूर येथे बाबा कालीचरण यानं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात जे अपशब्द वापरले त्याविरोधात आम्ही गुन्हा नोंदवला आहे. त्याचबरोबर गांधीहत्येचं समर्थन करत त्यानं नथुराम गोडसेबाबत गौरवौग्दार काढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनं पुन्हा या वक्तव्याचं समर्थन केलं. तसेच माझ्यामध्ये जे येतील त्यांना मी कापून टाकेन अशा प्रकारचं वक्तव्य केलं. याआधीही झालेल्या भाषणांमध्येही त्यानं द्वेष पसरेल अशी भाषा वापरली, यासाठी त्याच्यावरती मी स्वतः गुन्हा नोंदवलेला आहे. कलम २९४, कलम २९५ अ, २९८, ५०५-२, ५०६-२, आयपीसी ३४ अशा सहा कलमांतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पुढची कारवाई पोलीस करतील” अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -4 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025

गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक

vishwatmaklokswamivarta

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक

vishwatmaklokswamivarta

जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी केंद्र सरकारला दिला इशारा ‘२ ऑक्टोबरला भारत ‘हिंदू राष्ट्र’ घोषित करा नाहीतर जलसमाधी..

vishwatmaklokswamivarta

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर,अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार

विधानसभा लक्षवेधी सूचना :भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या विकासकांवरीलकारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ