vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर,अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर,अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार

नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन..

 

    राज्य प्रतिनिधी – मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ याकालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

या दौऱ्या दरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

 

समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे:

समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. त्यानंतर जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता बैठक घेण्यात येणार आहे. दि. १६ ऑक्टोबरला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर हिंगोली येथे दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे, नांदेड येथे दि. १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता ही बैठक होणार आहे. दि.२१ ऑक्टोबरला लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता, धाराशिव येथे दि.२२ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर बीड येथे दि. २३ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार महाराष्ट्र सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर; दिमाखदार वाटचालीसाठी नागरिकांचे अभिनंदन

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन ; सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्दी

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत “महानाट्य” प्रेक्षकांसाठी विनामूल्य हायलँड पार्क मैदानावर दि.22, 23 आणि 24 मार्च रोजी होणार सादरीकरण.

शेतकऱ्यांनी बांबू शेतीसाठी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*20 हजार हेक्टरवर बांबू शेतीचे उद्दिष्ट..

नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीसाठी यंत्रणा सुसज्ज ठेवा -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

वर्ष 2017 ते 2020 पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षातील वस्तू व सेवाकरमागण्यांशी संबंधीत-व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना लागू ; 30 मार्च अंतिम मुदत- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती..

vishwatmaklokswamivarta