vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळानी राज्यपाल रमेश बैस यांची घेतली भेट,राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर केली विस्तृत चर्चा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळानी राज्यपाल रमेश बैस यांची घेतली भेट,राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर केली विस्तृत चर्चा

मुंबई प्रतिनिधी ः विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, चंद्रकांत हांडोरे, भाई जगताप, नसीम खान, माजी खा. हुसैन दलवाई, माजी आ. अशोक जाधव, आ. अमिन पटेल, आ. अस्लम शेख, आ. सिद्दीकी, संदेश कोंडविलकर, सचिन सावंत आदींची उपस्थिती होती.

राज्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे 48 तासांत 31 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 16 नवजात शिशुंचा समावेश आहे. तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे 24 तासात 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात महापालिकेच्या अनास्थेमुळे 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 23 जणांचा मृत्यू झालेला आहे, एकंदरीतच, राज्यातील आरोग्य व्यवस्था ही व्हेंटीलेटरवर असून शासनाच्या अनास्थेमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे दिसून येते. तरी राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंसंदर्भात निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमणूक करावी. तसेच प्रत्येक मृत व्यक्तिच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु. 10 लक्षची आर्थिक मदत करावी.

राज्यामध्ये तरुण बेरोजगारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. असे असतांना शासनाने शासकीय सेवेतील विविध पदे ही नऊ कंपन्यांमार्फत कंत्राटी स्वरुपात भरण्याचा निर्णय घेऊन राज्यातील विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे. तसेच याव्दारे अप्रत्यक्षपणे विविध संवर्गातील जसे अनुसूचित जाती अनुसुचित जमाती, ओबीसी व भटक्या विमुक्त जमातीचे आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी शासनसेवेतील पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याचा हा शासननिर्णय तात्काळ रद्द करावा.

जालना येथे मराठा आरक्षणा संदर्भात सुरु असलेल्या उपोषणावेळी सरकारने जालना जिल्हयातील अंर्तवली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. एकंदरीतच मराठा, ओबीसी व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भातील आंदोलन हाताळण्यात सरकारला अपयश आलेले आहे. त्यामुळे राज्यातील विविध जाती-जमातीतील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम शासनाने केलेले आहे. तरी जालना जिल्ह्यातील या लाठीचार्जची निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमणूक करून चौकशी करावी.

सत्ताधारी पक्षातील काही खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांचे अधिकारी/कर्मचारी यांना दमदाटी करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. मात्र या संदर्भात गृह विभागाला कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश आलेले आहे. त्यामुळे शासकीय कर्मचार्‍यांमध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधींबद्दल नाराजीचे वातावण आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असुनसुध्दा सरकारने दुष्काळ घोषित न केल्याने शेतकरी व जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अवकाळी पावसामूळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेली नाही. शासनाच्या शेतकर्‍यांविषयीच्या असंवेदनशील धोरणामुळे विदर्भ व मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. शासनाप्रती शेतकर्‍यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झालेली आहे. तरी या संदर्भात शासनाने तात्काळ दुष्काळ घोषित करुन, दुष्काळाच्या उपाययोजना करण्याबाबत आपण शासनास निर्देशित करावे.

तसेच महिलांवरील बलात्कार, विनयभंग, छेडछाड असे प्रकार वाढले असून महिलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये 22 टक्क्यांने वाढ झालेली आहे. तसेच राज्याच्या गृहविभागाच्या अहवालानुसार गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली असून, एकंदरीतच राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. तरी या संदर्भात मा. राज्यपाल महोदयांनी स्वतः बैठक घेऊन लक्ष घालावे. उपरोक्त नमुद वस्तुस्थिती लक्षात घेता, या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण विधीमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, मा. उच्च न्यायालयाने रुग्णालयात झालेल्या मृत्युची दखल घेतली आहे. हे एक प्रकारे राज्य सरकारचे अपयश आहे. त्यामुळे वैद्यकीय मंत्री व आरोग्य मंत्री यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली;५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

vishwatmaklokswamivarta

इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातूनक्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न-गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस; ऐन उकाड्यात काहीसा दिलासा..

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस — सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पळस्पे ते कशेडी बोगदा रस्त्याची केली पाहणी

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक