vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांच्यासह त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि गौतम थापर यांच्याविरोधात अखेर आरोपपत्र दाखल

येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांच्यासह त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि गौतम थापर यांच्याविरोधात अखेर आरोपपत्र दाखल

 

मुंबई प्रतिनिधी येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांच्यासह त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि गौतम थापर यांच्याविरोधात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात इडीने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. मुंबई सेशन कोर्टातील विशेष पीएलएलए कोर्टात हे आरोप पत्र दाखल केले आहे. गैतम थापर यांच्या अवंथा कंपनीला 1900 कोटी रुपये कर्ज अवैधरित्या दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणात राणा आणि थापर या दोघांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय आहेत आरोप?

 

गौतम थापर यांची  अवंथा नावाची कंपनी आहे. या कंपनीला येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांनी नियमांचे उल्लंघन करून, तब्बल 1900 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्याबदल्यात राणा यांना गौतम थापर यांनी त्यांचा दिल्लीमधील बंगला अर्ध्या किमतीला विकला होता, असा आरोप ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणी आता राणा कपूर त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि गौतम थापर यांच्याविरोधात इडीने  विशेष न्यायालयात आरोप पत्र दाखल केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

मर्जीतल्या लोकांना अवैधरित्या कर्ज दिल्याचा आरोप

 

दरम्यान  येस बँकेमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राणा कपूर यांचा संपूर्ण परिवारच संशयाच्या भोवऱ्यात आहे. राणा कपूर यांची पत्नी बिन्दू कपूर, त्यांच्या तीन मुली राखी, रोशनी आणि राधा यांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. बेकायदेशीर कर्ज मिळवून देण्याच्या बदल्यात राणा कपूर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलींना लाच देण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, राणा कपूर आणि अशोक कपूर यांनी 2004 मध्ये येस बँकेची स्थापना केली होती. त्यानंतर राणा यांनी येस बँकेतून स्वत: च्या मर्जीने जवळच्या लोकांना मोठे कर्ज दिल्याचा आरोप आहे. 2017 मध्ये येस बँकेने 6 हजार 355 कोटी रुपयांचे कर्ज दिले

संबंधित पोस्ट

हरवलेली मुलगी आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

 मुंबईतील कुर्ला परिसरात येथील नागरी कंत्राटदारावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पश्चिम बंगालमधून तिघांना अटक

vishwatmaklokswamivarta

बनावट चलन प्रकरणी NIA चे मुंबईत 6 ठिकाणी छापे; गुन्हेगारी साहित्य जप्त…

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचीउल्लेखनीय कामगिरी..

vishwatmaklokswamivarta

नयनरम्य परिसर  लोणावळा व्हिला बुकिंग प्रकरणात ऑनलाइन फसवणूक उघड; आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

प्रतापगड घटना उत्तर प्रदेश ,रविवार पेठेतील भांडे व्यापाऱ्याच्या दुकानातून पाच लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. भांडे व्यापाऱ्याकडे काम करत असलेल्या कामगार आणि साथीदाराने रोकड लांबविल्याचा संशय व्यापाऱ्याने फिर्यादीत व्यक्त केला