
मी नेहमीच भाजपापासून प्रभावित; भाजप प्रवेशानंतर अपर्णा यादव यांची प्रतिक्रिया….
उत्तर प्रदेश प्रतिनिधी यूपीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. मुलायम कुटुंबातील धाकटी सून अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिलाय. पक्ष प्रवेशानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,”माझ्यासाठी देश सर्वात महत्वाचा आहे त्यामुळे मी नेहमीच पंतप्रधानांपासून प्रभावित झाली आहे. भाजपच्या कार्यशैलीपासून मी नेहमीच प्रभावित झाली आहे”



