vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणांनी केले आक्षेपार्ह संभाषण; महिला आयोगाने बजावली नोटीस…

अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणांनी केले आक्षेपार्ह संभाषण; महिला आयोगाने बजावली नोटीस…

नागपूर : प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने पत्नी आणी १८ महिन्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत घरठाव केला. महिलेने तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता खासदार नवनीत राणा यांनी तिच्यासोबत आक्षेपार्ह भाषेत संभाषण केले. यासंदर्भात महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. यानंतर नवनीत राणा (Navneet Rana) यांना नोटीस बजावून खुलासा मागितल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यातील महिलेची तक्रार राज्य महिला आयोगाला १७ जानेवारी रोजी प्राप्त झाली होती. तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिस ठाण्याला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पतीने आपल्याला अंधारात ठेवून दुसरा विवाह केला आणि १८ महिन्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडले, असा आरोप महिलेने केला होता. या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे हा पदाधिकारी नवनीत राणा  यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे. राणा यांनी महिलेची तक्रार ऐकून न घेता आरोपीला पाठीशी घालण्याचे काम केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्या सोबतीने देऊरमधील नागरिकांशी साधला संवाद मतदार नोंदणी करण्याचे केले आवाहन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय मतदार दिन सोहळ्याचे २५ जानेवारी रोजी आयोजन

vishwatmaklokswamivarta

नायलॉन मांजा वापरल्यास पालकांना 50 हजार, तर विक्रेत्यांना अडीच लाखांचा दंड; हायकोर्टाचा इशारा

vishwatmaklokswamivarta

तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ४ हजार ५३७ रुग्णालयांमध्ये २ हजार ३९९ मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

vishwatmaklokswamivarta