vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने मंत्रालयासमोर सुरेश सखाराम पेडणेकर यांचा आत्मदहनाचा इशारा

शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने मंत्रालयासमोर सुरेश सखाराम पेडणेकर यांचा आत्मदहनाचा इशारा

कोकण : प्रतिनिधी गेल्या कित्येक वर्षापासून कणकवली ते मंत्रालय असा पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली फोंडाघाट येथील रहिवासी सुरेश सखाराम पेडणेकर (70) यांनी येत्या 26 जानेवारी रोजी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. चुलत भाऊ तसेच कणकवली येथील सरपंच, ग्रामसेवक, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक, समाजकंटक माझ्या जमिनीची बोगस कागदपत्राआधारे मोजणी करीत आहेत. माझ्या मालकीची जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत आहे. सदरच्या मोजणीला माझा विरोध आहे या प्रकरणी मी वारंवार तक्रारी देऊनही मला न्याय मिळालेला नाही. मी वयोवृद्ध असल्याने याचा गैरफायदा घेतला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी लक्ष देऊन मला न्याय मिळावा असा प्रयत्न करावा, अन्यथा येत्या 26 जानेवारी रोजी मे मंत्रालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे सुरेश सखाराम पेडणेकर यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर क

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश जारी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 68 गावात पाणी उपसा करण्यास बंदी

vishwatmaklokswamivarta

🔥 पानिपतची तिसरी लढाई (१७६१)

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्यासाठी मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वेची सुविधा*माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यास यश!*

vishwatmaklokswamivarta

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता..

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी.