
हेलिकॉप्टरच्या विलंबामागे भाजपचाच हात, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी….. अखिलेश यादव समाजवादी पार्टी अध्यक्ष
नवी दिल्ली प्रतिनिधीउत्तर प्रदेश विधानसभेच्या (UP Assembly Election 2022) निवडणुकीपूर्वी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर (BJP) मोठा आरोप केला आहे. कुठलेही ठोस कारण नसताना आपले हेलिकॉप्टर दिल्लीत थांबल्याचे ट्विट अखिलेश यांनी केले आहे. अखिलेश यादव मुझफ्फरनगरमध्ये निवडणूक रॅलीला (Rally) संबोधित करणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर दिल्लीतच रोखून धरल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच हे पराभूत भाजपचे षड्यंत्र असून, जनतेला सगळं समजतंय… असे देखील अखिलेश यादव यांनी म्हटले होते. मात्र आता निवडणुक आयोगाने याची दखल घ्यावी असे यादव म्हणाले आहेत
निवडणूक आयोगाने दखल घेण्याची मागणीकेंद्र सरकारने दिल्लीतील त्यांचे हेलिकॉप्टर पत्रकार परिषदेपूर्वी रोखल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाने दखल घेण्याची मागणी केली आहे. भाजप निवडणुकीपूर्वी काहीही करू शकते असं अखिलेश म्हणाले, एखाद्याला पत्रकार परिषदेला जायचं असेल आणि अधिकारी त्याला हेलिकॉप्टरमद्ये बसण्यापूर्वी तब्बल २ तास थांबावे लागत असेल तर तो इच्छित स्थळी कसा पोहचेल? मला आशा आहे की, निवडणुक आयोगाने याची दखल घ्यावी असं यादव म्हणाले



