
खऱ्या हिंदुत्त्ववाद्याने जिन्नांना गोळी मारली असती, गांधीजींना नाही’ शिवसेना खासदार संजय राऊत
नवी दिल्ली प्रतिनिधी- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा हिंदुत्त्ववादाचा मुद्दा पुढे आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एका हिंदुत्त्ववाद्याने गांधीजींना गोळी मारली होती.सर्व हिंदुत्त्ववाद्यांना वाटतं की गांधीजी राहिले नाहीत. जिथं सत्य आहे तिथं आजही बापू जिवंत आहेत.’ दरम्यान, हिंदुत्त्ववाद्याचा मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर राऊत यांनी म्हटलं की,’खरा हिंदुत्त्ववादी असता तर त्याने गांधीजींना नाही तर जिन्नांना गोळी मारली असती, ते देशभक्तीचं काम झालं असतं
राहुल गांधींनी केलेल्या ट्विट संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, खरा हिंदुत्त्ववादी असता तर त्याने जिन्नांना गोळी मारली असती. गांधीजींना का गोळी मारली असती? पाकिस्तानची मागणी ही जिन्नांची मागणी होती. तुम्ही मर्द होतात. तुमच्याकडे मर्दानगी होती, तर पाकिस्तानची मागणी केल्यानंतर, ज्यांनी इथं हिंसाचार पसरवला, फाळणी केली त्यांना गोळी मारली असती. ते देशभक्तीचं काम असतं.



