
नारायण राणे सह नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या
; दिशा सालियन प्रकरणी पोलिसांचं समन्स..
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केलेल्या आरोपांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या मागे चौकशीचा फेरा सुरू होणार असल्याचं दिसतं आहे. दिशाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी नारायण राणेंसह नितेश राणेंनाही समन्स बजावलं आहे.
दिशा सालियनची बलात्कार हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आता नारायण राणेंसह नितेश राणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नितेश राणे यांना आज (३ मार्च) सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.
त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जबाब नोंदवण्यासाठी गुरुवारी (४ मार्च) सकाळी ११ वाजता मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आलं आहे. मालवणी पोलिसांनी मयत दिशा सालियनच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला असून, आता नारायण राणे आणि नितेश राणेंची चौकशी केली जाणार आहे.
राणेंवर कोणती कलमं लावण्यात आलीये?
कलम 500 – बदनामी संदर्भातील कलम आहे. दुसऱ्याची बदनामी करणाऱ्याला दोन वर्षांपर्यंत तुरूंगवास किंवा दंड किंवा गरज भासल्यास दोन्ही शिक्षा, अशी तरतूद कलमान्वये होते.
कलम 509 – कोणत्याही स्त्रीचं प्रतिष्ठा हनन करणं. त्या इराद्याने तसे शब्द वापरणं, कोणताही आवाज, हावभाव करणं किंवा एखादी वस्तू दाखवून त्या स्त्रीचा अपमान करणं. स्त्रीचा अपमान होईल या हेतूने तसे शब्द वापरणं. स्त्रीच्या गोपनीयतेचा भंग यासाठीचं हे कलम आहे. यामध्येही कठोर शिक्षेची तरतूद आहे.



