vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

महाराष्ट्रात ‘वादळ’ अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळे झोपले, ते अजून उठलेच नाहीत; राऊतांचा भाजपला टोला..  

 महाराष्ट्रात ‘वादळ’ अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळे झोपले, ते अजून उठलेच नाहीत; राऊतांचा भाजपला टोला..

 

मुंबई प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधक वादळ निर्माण करणार, यामध्ये काहीही तथ्य नाही. महाराष्ट्रात वादळ हे अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळेच झोपले, ते अजून उठलेच नाहीत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला. विरोधक साधी फुंकर मारतात पण त्यांना वादळ आल्यासारखं वाटतं. पण महाविकासआघाडीची १७० आमदारांची ताकद कायम आहे. त्यामुळे अधिवेशनात वादळ वगैरे येणार नाही. ठाकरे सरकारला साधा ओरखडाही उठणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील समस्यांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सभागृहात आदळआपट करून प्रश्न सुटणार नाहीत. आम्ही लोकशाही मानतो. लोकसभा आणि राज्यसभेत लोकशाही नसली तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक परंपरा आहे. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. आगामी काळात उद्धव ठाकरे आणखी सक्रिय होत महाराष्ट्रभर फिरतील, असेही त्यांनी म्हटले.

तसेच संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. चंद्रकांत पाटील अनेकदा म्हणतात की, अमुकतमुक व्यक्तीला काय किंमत आहे. पण माझा सवाल आहे की, चंद्रकांत पाटील यांना भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काय किंमत उरली आहे. मला चंद्रकांत पाटील यांची दया येते, त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते, असेही राऊत यांनी म्हटले.

थोड्याचवेळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल. राज्यपाल कोश्यारी आज अभिभाषणात काय बोलणार, हेदेखील पाहावे लागेल. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले होते. तर महाविकासआघाडी सरकारने भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखली होती.

संबंधित पोस्ट

मराठ्यांना मागच्या दारातून आरक्षण घेऊ देणार नाही,,शिंदे समितीच्या कामकाजावर भुजबळांचा आक्षेप..

vishwatmaklokswamivarta

आज महाराष्ट्रात काँग्रेस विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार उभाठा नेते संजय राऊत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली

vishwatmaklokswamivarta

देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याचा छंदच; खासदार संजय राऊत यांचा टोला..

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत आजच्या भेटीत अर्जुन खोतकर रावसाहेब दानवे यांचं वैर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिटवलं; खोतकरही शिंदे गटात? चर्चां….

संसदीय परंपरेत महाराष्ट्र विधीमंडळ उच्चस्थानी- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

राहुल नार्वेकर ‘पुन्हा येईन म्हटले नव्हते तरीही राहुल नार्वेकर पुन्हा आले!’ फडणवीसांनी सांगितलं दोघांमधील साम्य, सभागृहात हशा पिकला

vishwatmaklokswamivarta