vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत अपार्टमेंटच्या गच्चीवरुन पडल्याने मराठी साहित्यिकाचा जागीच मृत्यू..

मुंबईत अपार्टमेंटच्या गच्चीवरुन पडल्याने मराठी साहित्यिकाचा जागीच मृत्यू..

: मुंबई प्रतिनिधी साहित्य क्षेत्रामध्ये मोठे नाव असलेले मार्तंडराव माळी आज (बुधवारी) सकाळी त्यांच्याच अपार्टमेंटच्या गच्चीवर फिरत असताना सर्विस गल्लीमध्ये पडले. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे साहित्य क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. ते मराठा सेवा संघाचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता देखील काही जण व्यक्त करत आहेत. मात्र, यासंदर्भात अजून पर्यंत तरी पुष्टी होऊ शकली नाही.

शास्त्री नगर येथे राहणारे साहित्यिक मार्तंडराव माळी हे काही दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसल्यामुळे रुग्णालयात भरती होते. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना आठ दिवसांपूर्वी घरी आणलं होतं नित्यनेमाने ते दररोज सकाळी त्यांच्या अपार्टमेंटच्या गच्चीवर फिरायला जात होते. आजही ते सकाळी फिरायला गेले होते. मात्र, अपार्टमेंटच्या मागे असलेल्या सर्विस गल्लीमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. काही जणांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली आहे. काहींचं म्हणण्यानुसार चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर काहींनी त्यांनी आत्महत्या केल्याचा कयास लावला आहे.

 

 

मराठा सेवा संघाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून मार्तंडराव माळी यांची ओळख आहे. अनेक सेवा संघाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. मराठा सेवा संघाला संघटित करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे मराठा सेवा संघामध्ये त्यांची चांगली ओळख आहे. मार्तंडराव माळी यांच्या मृत्यूची वार्ता सर्वत्र पसरली. यानंतर मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.

साहित्यक्षेत्रात मार्तंडराव माळी यांचे मानाचे स्थान

अकोला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्याच्या साहित्य क्षेत्रामध्ये मार्तंडराव माळी यांचं नाव मोठं आहे. त्यांनी अनेक कवितेची पुस्तकं लिहिली आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना मानाचं स्थान आहे. त्यांच्या मृत्यूमुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

संबंधित पोस्ट

तुळजाभवानीच्या भक्तांसाठी मोठी बातमी; तुळजापूर रेल्वेने जोडण्यासाठी ४५२ कोटीची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय…

vishwatmaklokswamivarta

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून  -निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..🌳 जिल्ह्यातील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

राज्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा  इशारा; अनेक भागात गारपीट ..

मुंबई आयुक्त इक्बालसिंह चहल यांना इन्कम टॅक्सची नोटीस….

विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबुवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊ- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

vishwatmaklokswamivarta