vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तुळजाभवानीच्या भक्तांसाठी मोठी बातमी; तुळजापूर रेल्वेने जोडण्यासाठी ४५२ कोटीची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय…

 तुळजाभवानीच्या भक्तांसाठी मोठी बातमी; तुळजापूर रेल्वेने जोडण्यासाठी ४५२ कोटीची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय…

 

महाराष्ट्र प्रतिनिधी: मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ४५२ कोटी ४६ लाख रुपये मंजूर केले. यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र हे रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये आणि भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

 

तुळजापुर तीर्थक्षेत्र हे रेल्वेने जोडले जावे ही मागणी गेल्या ४ दशकांपासूनची होती. ती आता सत्यात उतरताना दिसतेय. यापूर्वी सोलापुर – तुळजापुर – उस्मानाबाद रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. या रेल्वेसाठी तुळजापूर तालुक्यातील काही गावातील जमिनींचे अधिग्रहण करण्याचे काम सुरू होते. फक्त निधीमुळे या रेल्वे मार्गाचे काम संथ गतीने सुरू होते. आता मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ४५२ कोटी ४६ लाख रुपये निधी मंजूर केल्यामुळे या रेल्वे मार्गाला आता गती येणार आहे. भविष्यात भाविक तुळजा भवानीच्या दर्शनाला रेल्वेने दाखल होतील. तसेच या रेल्वे मार्गामुळे व्यापार आणि उद्योग व्यवसाय वाढण्यास मदत होईल.

 

 

 

 

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी निधी

 

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याचे ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पासाठी ९०४ कोटी ९२ लाख इतका खर्च येणार असून ५० टक्के सहभाग राज्य शासनाचा आहे.

 

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे स्थानिक व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. मात्र रेल्वेची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होते म्हणून विविध लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षांपासून मागणी केलेली होती. या रेल्वे मार्गाची लांबी ८४.४४ किमी असून यावर १० रेल्वे स्थानके असतील तसेच ४ वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

संबंधित पोस्ट

भारतीय सैन्याने दाखविलेल्या पराक्रमाला  क्रांतीचौकात देशभक्तिपर गीतांच्या माध्यमातून भारतमातेचा जयघोष करीत सलाम करण्यात आला. देशसेवा करताना वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली

जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी विनापरवाना ड्रोन वापरास बंदी…

भोपाळ चे खासदार लोकप्रिय असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर आता आपल्या लसीकरणावरून पुन्हा एकदा चर्चेत….

vishwatmaklokswamivarta

रेल्वे जागेवरील झोपडपट्ट्याच्या पुनर्वसनसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार- मंत्री उदय सामंत

राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक**- जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी**प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा संपन्न* 

vishwatmaklokswamivarta

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र-रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र

vishwatmaklokswamivarta