
भोपाळ चे खासदार,घरीच घेतली कोरोना लस; लोकप्रिय असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर आता आपल्या लसीकरणावरून पुन्हा एकदा चर्चेत….
प्रतिनिधी,
नवी दिल्ली – भाजपाच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एका टीमने त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस दिली. प्रकृती बरी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांनी लस घेतली नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता घरच्या घरी त्यांनी लस देण्यात आल्याने काँग्रेसने यावरून जोरदार निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर आता आपल्या लसीकरणावरून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आल्या आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मोदींसह भाजपाचे मोठे नेते हे रुग्णालयात जाऊन लसीकरण करत आहेत आणि अशा परिस्थितीत ठाकूर यांना घरबसल्या लस मिळते यावरून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते नरेंद्र सलूजा यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ठाकूर यांना कोणत्या आधारावर घरबसल्या कोरोना लस मिळाली याचं उत्तर द्या असं सलूजा यांनी म्हटलं आहे.



