
ठाणे महानगर पालिकेच्या उपायुक्तांवर कोविंड हॉस्पिटलच्या नर्सने केला गंभीर विनयभंगाचा आरोप…
प्रतिनिधी : ठाणे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर नर्सच विनयभंग केल्याचा गंभीर आरोप आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. आरोप असलेल्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्यावर हा आरोप आहे.
कोविंड हॉस्पिटल करिता पीडित नर्सला वर्षभरापूर्वी कंत्राटी पद्धतीने नोकरीवर घेण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी विश्वनाथ केळकर यांनी आपला फायदा उचलण्याचा प्रयत्न केला व अश्लील कमेंट केल्या चा , गंभीर आरोप नर्सने केला आहे.
कोविंड हॉस्पिटल कंत्राटी कर्मचारी असणाऱ्या महिला कामगार हिने, पालिका उपायुक्त केळकर यांनी फेब्रुवारी महिन्यात माझ्याबरोबर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण मी विरोध केल्यानंतर ते माझ्यावर रागवले असा आरोप पीडित नर्सने केला आहे. तिने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.



