vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई भाजपा कार्यालयात चंद्रकांत पाटील फु्ल्ल जोशात, झेंडा घेऊन नाचले, ढोलही वाजवला; फडणवीसांच्या स्वागताला भाजप मुख्यालयात जल्लोष

मुंबई भाजपा कार्यालयात चंद्रकांत पाटील फु्ल्ल जोशात, झेंडा घेऊन नाचले, ढोलही वाजवला; फडणवीसांच्या स्वागताला भाजप मुख्यालयात जल्लोष…

मुंबई प्रतिनिधी: देशातील चार राज्यांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर मुंबईतील भाजप मुख्यालयात शुक्रवारी मोठ्या जल्लोषाचे वातावरण होते. गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून काम पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा आज भाजप मुख्यालयात सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी भाजपचे सर्व प्रमुख नेते याठिकाणी जमले होते. यावेळी ढोलताशांचा गजर सुरु असताना भाजपच्या नेत्यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. विशेष म्हणजे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही (Chandrakant Patil) भाजपचा झेंडा नाचवत थिरकले. एवढेच नव्हे तर त्यांनी ढोलही वाजवला व भाजपच्या इतर नेत्यांसोबतही ते नाचले. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही चांगलेच जोशात आले होते. (BJP celebration in Mumbai)

 

आता थोड्याचवेळात याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला जाईल. देवेंद्र फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी होते. गोव्यातील भाजपच्या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील वजन आणि पत आणखीनच वाढली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच गोव्यातील विजयाचे शिल्पकार आहेत, अशी भावना भाजपच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

 

एक्झिट पोल्सनी गोव्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्त्वात येईल, असा अंदाज वर्तविला होता. याठिकाणी बहुमतासाठी २२ जागांची गरज होती. मात्र, काँग्रेस आणि भाजपपैकी कोणालाच बहुमत मिळणार नाही, असे अंदाज होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेली उमेदवारांची निवड, अचूक व्यवस्थापन आणि प्रचारामुळे भाजपने हे सगळे अंदाज मोडीत काढत गोव्यात २० जागा जिंकल्या. त्यानंतर अपक्ष उमेदवारांनीही भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊ केला. त्यामुळे गोव्यात भाजप सहजपणे सत्ता स्थापन करेल, हे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीतही आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवली होती. त्याठिकाणीही भाजपने तेजस्वी यादव यांचे आव्हान परतवून लावत मोठे यश मिळवले होते. या सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे साहजिकच देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील राजकीय वजन वाढले आहे.

संबंधित पोस्ट

मुंबईत बी ई एसटी बसेस ठप्प; बसचालकांच्या संपामुळे नागरिकांचे हाल

शिवराज्याभिषेक सोहळा-2025 करिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

काली चित्रपटाच्या पोस्टरवर संतापले चित्रपट निर्माते; सर्वोच्च न्यायालय आणि नुपूर शर्मा यांचा उल्लेख करत म्हटलं…

राजकीय पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांनी केले आवाहन

दारूवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात; नवे दर जाहीर…  

vishwatmaklokswamivarta

भव्य दिव्य अयोध्येच्या राम मंदिर उद्द्घाटनाचा आपलाआनंद ,13 हजार फूटावरून स्कायडायव्हिंग करत ‘जय श्री राम’ चा झेंडा फडवत केला  व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल .. 

vishwatmaklokswamivarta