vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

महाराष्ट्र राज्यात एसटीच्या ‘या’ योजनेला पुन्हा मुदतवाढ, राज्य सरकारची मोठी घोषणा…

महाराष्ट्र राज्यात एसटीच्या ‘या’ योजनेला पुन्हा मुदतवाढ, राज्य सरकारची मोठी घोषणा…

मुंबईचा प्रतिनिधी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच सध्या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आगार तसेच विभागीय कार्यालयात स्मार्टकार्ड (ST smart card) नोंदणीकरण आणि वितरण प्रक्रिया होऊ शकलेली नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला 31 मे, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

राज्य परिवहन सेवेतील प्रवासासाठी 1 जून, 2022 पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याने या मुतदवाढीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री परब यांनी केले आहे.  महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देत आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेली  ‘स्मार्ट कार्ड’ काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे.

 

एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग तसेच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्डासाठी नोंदणी करणे किंवा स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

खऱ्या हिंदुत्त्ववाद्याने जिन्नांना गोळी मारली असती, गांधीजींना नाही’ शिवसेना खासदार संजय राऊत 

vishwatmaklokswamivarta

मुंबई, दिल्ली सह भारतात अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर आज स्थिर; पहा काय आहे पेट्रोल, डिझेल चा दर

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा -जिल्हाधिकारी संजय यादव

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदार संघनिहाय होणारे प्रशिक्षणाचे वेळापत्रक याप्रमाणे-दि.५ व ६ एप्रिल रोजी