
भाजपची काळी जादू चालणार नाही, सरकार पाच वर्ष पूर्ण करणार; नाना पाटोळे यांना विश्वास….
भंडारा प्रतिनिधी भंडारा: जे सत्तेचे पिपासू आहेत. त्यांची सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांची जी तडफड सुरू आहे. त्या तडफेचा हा आवाज आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांची बरोबरीची भागिदारी आहे. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार सुरू आहे. कोरोनामुळे हा अजेंडा राबवता आला नाही. आता अजेंडा राबवणं सुरू झालं आहे. विरोधकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे अफवा उडवून सरकारमध्ये मतभेद निर्माण केला जात आहे. पण यांच्या काळ्या जादूचा फरक पडणार नाही. त्यांची सत्तेवर काळी नजर आहे. पण या काळ्या जादूचा प्रभाव पडणार नाही. हे सरकार पाच वर्ष चालेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
नाना पटोले यांनी कालही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपला धारेवर धरले होते. ओबीसींचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत आणि ते न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करु. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला केंद्र सरकारकडील डाटा 98 टक्के अचूक आहे पण ते देत नाहीत. जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, महात्मा फुले व सावित्रिबाई यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले पण त्यांचा अपमान करण्याचे धाडस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले, महाराष्ट्र हा अपमान सहप करणार नाही. ओबीसी समाजासाठी मी सदैव संघर्ष करत आलो आहे आणि आपले हक्क मिळवण्यासाठी यापुढेही संघर्ष करत राहू, असं पटोले म्हणाले होते.



