
ईडीने मालमत्ता जप्त केल्यानंतर शिवसेनास खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया, ‘घाबरत नाही, तुम्हाला फाट्यावर मारतो’
मुंबई प्रतिनिधी
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आलिबाग (Alibag) येथील जमीन आणि मुंबई (Mumbai) येथील राहते घर जप्त केले. या कारवाईमुळे राज्यासह देशाच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे.
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आलिबाग (Alibag) येथील जमीन आणि मुंबई (Mumbai) येथील राहते घर जप्त केले. या कारवाईमुळे राज्यासह देशाच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या रोखठोक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ‘ईडीकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने करण्यात येत आहे. ही कारवाई करण्यापूर्वी आम्हाला एक नोटीसही देण्यात आली नाही. आम्ही असल्या कारवाईला घाबरत नाही. माझी जी काही मालमत्ता आहे ती कष्टाची आहे. त्यामुळे असल्या कारवाईला मी फाट्यावर मारतो’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही जी काही मालमत्ता घतली आहे ती कष्टाच्या पैशांतून घेतली आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे मनी लॉन्डींग झाले नाही. ईडीने नीट चौकशी करावी. आमच्या व्यवहारात एक पैसाही फ्रॉडचा निघाला तर माझी सर्व संपत्ती भाजपला दान करेन आणि राजकारण, समाजकारण यांतून निवृत्ती घेईन, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही जी प्रॉपर्टी घेतली ती 2009 मधील आहे. आता इतकी वर्षे झाल्यानंतर त्यांना त्यात मनी लॉन्ड्रींग दिसू लागले आहे. मी पुन्हा सांगतो मनी लॉन्ड्रींगच्या एका पैशातून आम्ही ही प्रॉपर्टी विकत घेतली असेल तर ती मी भाजपला दान करेन असा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला. ते दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते



