
आंध्र प्रदेशमध्ये गॅस गळतीमुळे रासायनिक कारखान्याला आग, 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी…
आंध्रप्रदेश प्रतिनिधीया अपघातात 12 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळतीमुळे ही घटना घडली.
Fire in Chemical Factory : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एलुरु जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम (Akkireddigudem) येथे एका रासायनिक कारखान्याला (Chemical Factory) लागलेल्या भीषण आगीत (Fire) सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 12 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळतीमुळे ही घटना घडली.
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, एलुरुचे एसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितले की, नायट्रिक ऍसिड, मोनोमिथाइलच्या गळतीमुळे कारखान्याला आग लागली. आग लागली तेव्हा औषधनिर्मिती कारखान्याच्या युनिट 4 मध्ये अठरा जण काम करत होते. मृत्युमुखी पडलेल्या सहापैकी चार जण बिहारमधील स्थलांतरित कामगार होते. दोन तासांत आग आटोक्यात आणण्यात आली.
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.



